You are currently viewing प्राणजीवन सहयोग संस्थेचे उपक्रम स्तुत्य आणि कौतुकास्पद – अश्विनी मेहत्रे

प्राणजीवन सहयोग संस्थेचे उपक्रम स्तुत्य आणि कौतुकास्पद – अश्विनी मेहत्रे

महिलादिनी विविध उपक्रमांचे आयोजन करुन समाजसेवक संदिप चौकेकर यांनी केला महिलांचा सन्मान

कणकवली

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिरवलसारख्या ग्रामीण भागात प्राण जीवन सहयोग संस्थेच्या मार्फत नेत्र तपासणी शिबिर आणि ई -श्रम कार्ड सारखे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून हे उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि स्तुत्य आहेत.असे प्रतिपादन अश्विनी मेहत्रे यांनी केले.

शिरवल विठ्ठल मंदिर येथे जागतिक महिला दिनानिमित्त प्राणजीवन सहयोग संस्था आणि ओम गणेश मित्र मंडळ शिरवल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिराच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर प्राण जीवन सहयोग संस्थेचे सदस्य श्रीकृष्ण यादव , प्राजक्ता शेट्टी,मानसी शेडगे, रोहित कुरमुरे, स्वराज बिर्जे, अक्षता दळवी, प्रणाली जावडेकर,पुजा चिंचळकर,सुचित गुरव,ग्रा.पं.सदस्य पांडुरंग गुरव, राठीवडे उपसरपंच तथा प्राण जीवन सहयोग संस्थेचे उपाध्यक्ष स्वप्नील पुजारे, कणकवली प्रतिनिधी प्रशांत गावडे ,जिल्हा मिडिया प्रतिनिधी चकोर सावंत,किशोर दळवी, पोलिस पाटील विजय शिरवलकर,प्रविण तांबे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना अश्विनी मेहत्रे म्हणाल्या की, प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांनी आपल्या शिरवल गावातील महिलांसाठी आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी आणि मोफत चष्मा वाटप शिबिर, महिलांसाठी डिमर चे (वाफेचे यंत्र )वाटप तसेच ई – श्रम कार्ड शिबिर, खेळ पैठणीचा आणि, रेकॉर्ड डान्स स्पर्धा असे उपक्रम राबवून महिलांचा सन्मान केला आहे.मोफत नेत्र तपासणी करुन ज्यांना दृष्टी दोष आहे अशा लाभार्थ्यांना चष्मा वाटप करुन नवीन दृष्टी देण्याचे काम या शिबिराच्या माध्यमातून करत आहेत.निश्चितच प्राण जीवन सहयोग संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम संदीप चौकेकर करीत आहेत.ते राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत.

यावेळी नेत्रतपासणी शिबिरात एकुण ८२ जणांची नेत्रतपासणी करण्यात आली.यापैकी ५० जणांना चष्मा वाटप करण्यात येणार आहे.तर २५ व्यक्ती मध्ये मोतिबिंदूचा दोष आढळला आहे.तर ई- श्रम कार्ड शिबिराचा ५० जणांनी लाभ घेतला.डाॅ.गद्रे रुग्णालयाच्या टीमने नेत्र तपासणी केली.यावेळी गावातील लोकांनी याचा लाभ घेतला.

 

शिरवल :शिरवल ग्रामपंचायत येथे ई-श्रम कार्ड शिबिराच्या कार्यक्रमात व्यासपीठावर अक्षता दळवी, प्रणाली जावडेकर,ग्रा.पं.सदस्य पांडुरंग गुरव, राठीवडे उपसरपंच तथा प्राण जीवन सहयोग संस्थेचे उपाध्यक्ष स्वप्नील पुजारे, कणकवली प्रतिनिधी प्रशांत गावडे , पोलिस पाटील विजय शिरवलकर,सीआरपी सारीका गुरव आदी

प्रतिक्रिया व्यक्त करा