You are currently viewing सिंधुदुर्गात सोशल क्लबच्या नावाखाली जुगाराचे अड्डे

सिंधुदुर्गात सोशल क्लबच्या नावाखाली जुगाराचे अड्डे

*खाकी वर्दीचाही मिळतोय आशीर्वाद..!*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जुगार मटका अवैद्य दारू अशा धंद्यांना ऊत आला असून सोशल क्लब च्या नावाखाली धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेऊन काही क्लब सुरू आहेत. त्यातील बहुतांश सोशल क्लब मध्ये जुगाराचेच खेळ खेळले जातात आणि दिवसभरात लाखो रुपयांची उलाढाल अशा सोशल क्लबमधून होत आहे.

वेंगुर्ला तालुक्यातील *’घे’* तोरे येथील ‘सा’लकरवाडी येथे “अल्पेश सोशल क्लब” च्या नावाखाली सौदाबाजी सट्टाजुगार खेळला जातो. सदरचा क्लब हा ‘महे’श ‘ज’ळवी नामक इसम चालवत असून सकाळी १०.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत येथे सोशल क्लब या गोंडस नावाखाली राजरोसपणे जुगार खेळला जातो. दररोज सुमारे ६० ते ७० हजारांची उलाढाल होत असून नियमबाह्य सुरू असलेल्या सोशल क्लबवर खाकी वर्दीचा आशीर्वाद असल्याचे समजते आहे. खाकीच्या मेहरबानीवर जिल्ह्यातील अनेक क्लब राजरोसपणे अवैध्यरित्या जुगाराचे खेळ खेळत असून “तेरी भी चूप और मेरी भी चूप” अशाच आविर्भावात “तू खा मैं भी खाता हुं ” म्हणत गुण्यागोविंदाने अवैध्य सोशल क्लबला पाठीशी घालत आहेत. धर्मादाय आयुक्तांनी परवानगी असली तरी तिथे चालणारे खेळ हे खेळ आहेत की जुगार..? याची शहानिशा का करत नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + four =