कुडाळ नगरपंचायत हद्दीतील अतिक्रमण हटावाची घाई नको…

कुडाळ नगरपंचायत हद्दीतील अतिक्रमण हटावाची घाई नको…

कुडाळ

येथील नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील हद्दीत असलेली अनधिकृत बांधकामे व शासकीय जमिनीतील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई तात्काळ रोखण्यात यावी, अशी मागणी कुडाळ शिवसेना आणि सत्ताधारी भाजपा पक्षाचे नगरसेवक राकेश कांदे व त्यांच्या सहकार्‍यांनी कुडाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष ओंकार तेली व मुख्याधिकारी नितीन गाढवे यांच्याकडे केली आहे.
यात त्यांनी असे म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात लोकांची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. अशा परिस्थितीत नगरपंचायतीकडुन अशा प्रकारची कारवाई झाल्यास त्याचा फटका सर्वसामान्य नागरीकांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे ही कारवाई तुर्तास थांबविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यात शिवसेनेच्या माध्यमातून तालुकाप्रमुख राजन नाईक व माजी तालुकाप्रमुख संतोष शिरसाट यांनी मागणी आहे. तर सत्ताधारी भाजपाच्या माध्यमातून नगसेवक राकेश कांदे व त्यांचे सहकारी माजी नगराध्यक्ष विनायक राणे, उपनगराध्यक्षा सायली मांजरेकर, संध्या तेरसे, साक्षी सावंत, अश्विनी गावडे, सुनिल बांदेकर, अनंत धडाम आदींनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा