You are currently viewing सावंतवाडी लाखे वस्तीतील ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सुटणार – मुख्याधिकारी जावडेकर यांचे आश्वासन

सावंतवाडी लाखे वस्तीतील ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सुटणार – मुख्याधिकारी जावडेकर यांचे आश्वासन

सावंतवाडी

गेले कित्येक दिवस लाखे वस्तीमधील लोकांना पिण्याचे पाणी व सांडपाणी अश्या समस्यांना रोज सामोरे जावे लागल होते.
पिण्याचे पाणी तसेच सांड पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाण्या सहित मैला टाकीतून ओव्हर फ्लो होऊन रिटन संडासाच्या भांड्यातून घरभर पसरत होता त्यामुळे तेथील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. या अगोदर नगरपालिकेकडून आम्हाला वेळोवेळी सहकार्य मिळत होते परंतु गेल्या दोन वर्षापासून नगरपरिषदेने आम्हाला सहकार्या पासून वंचित ठेवले आहे अशी व्यथा तेथील जेष्ठनागरिक रघुनाथ लाखे यांनी मांडली. गेल्या तीन महिन्यांपूर्वी या समस्याचा पाठपुरावा करून सुद्धा यावर नगरपरिषदेची कोणतीही कार्यवही केली नाही. या रोजच्या परिस्थितीला कंटाळून लाखे व्यक्तीतील काही ज्येष्ठ मंडळींनी सामाजिक बांधिलकीशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली त्यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व संजय पेडणेकर यांनी याची तात्काळ दखल घेऊन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व अनारोजीन लोबो यांची मदत घेऊन मुख्याधिकारी जावडेकर यांचे लक्ष वेधले असता या विषयावर यशस्वी चर्चा होऊन येत्या दहा दिवसात या समस्यांवर योग्य तोडगा काढला जाईल असे आश्वासन मुख्याधिकारी जावडेकर यांनी दिले. तसेच आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांमुळे लाखे वस्तीसाठी नगरोत्थान मधून 6.5 लाख निधी नवीन विहिरीसाठी मंजूर झाला आहे याचे हि जावडेकर यांनी सांगितले. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची समस्या काल तत्काळ सुरळीत करण्यात आली तसेच सांडपाण्याच्या समस्यांवर सुद्धा लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सतत प्रयत्न केले जातील असे सामाजिक बांधिलकी कडून सांगण्यात आले.
याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे संजय पेडणेकर, रवी जाधव, दत्तात्रय सावंत,लाखे वस्तीतील ज्येष्ठ नागरिक रघुनाथ लाखे, राजू लाखे, किशोर लाखे, व असंख्य महिला उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा