You are currently viewing भाट्ये   येथील मच्छिमारांना आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

भाट्ये   येथील मच्छिमारांना आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी

मच्छिमारी हा व्यवसाय खूप जोखमीचा आहे.  वर्षानुवर्षे मासेमार करताना मासेमारांना समुद्रामध्ये विविध आपत्तीना तोंड द्यावे लागते . हृदय विकाराचा झटका येणे,  बोटीवरून पाण्यात पडून बुडणे इत्यादी आपत्तीमध्ये आपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे या बद्दलची शास्त्रीय माहिती मासेमारांना  असणे गरजेचे आहे. जेणेकरून आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळता येते अथवा कमी करता येते. या अनुषंगाने मच्छिमारांना आपत्तीचे व्यवस्थापन या विषयाचे महत्व ओळखून भाट्ये   येतील मासेमारांना  रिलायन्स फाउंडेशन , भाट्ये  मच्छिमार सेवा सहकारी संस्था भाट्ये  व  नागरी संरक्षण केंद्र रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने  आपत्ती व्यवस्थापनाचा प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम भाट्ये येते आयोजित करण्यात आला होता

या कार्यक्रमप्रसंगी रिलायन्स फाउंडेशनचे  जिल्हा व्यवस्थापक , श्री राजेश कांबळे, कार्यक्रम सहाय्यक चिन्मय साळवी  , नागरी संरक्षण  केंद्र रत्नागिरीचे उपनियंत्रक श्री मिलिंद  जाधव , सहाय्यक उपनियंत्रक उपस्थित होते.

या कार्यक्रमप्रसंगी रत्नागिरीच्या नागरी संरक्षण दलाचे सहाय्यक उपनियंत्रक श्री मिलिंद  जाधवयांनी समुद्रामध्ये मच्छिमारांना हृदय विकाराचा झटका आल्यास व पाण्यात बुडाल्यास,    मासेमारांना  हाताळायच्या विविध शास्त्रीय पद्धती प्रात्यक्षिकासहित समजावून सांगितल्या तसेच कृत्रिम श्वासोश्वास, CPR  म्हणजे हृदय विकाराचा झटका आलेल्या रुग्णाला कृत्रिम श्वासोश्वासवासाद्वारे दिलासा कसा द्यावा याचे  प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच  मच्छिमारांना प्राथमिक उपचार कसे द्यावेत या बद्दल  माहिती देण्यात आली . कार्यक्रमास भाट्ये मच्छिमार  सहकारी संस्था भाट्ये  चे सेक्रेटरी श्री अरमान भाटकर यांचे सहकार्य लाभले . मच्छिमारांच्या आप्पत्ती  प्रशिक्षणास उत्स्फूर्त सहभाग लाभला

.

प्रतिक्रिया व्यक्त करा