*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच, गझल प्राविण्य, गझल मंथन ग्रुप सदस्या लेखिका कवयित्री सौ.शोभा वागळे यांची गझल रचना*
*वृत्त अनलज्वाला*
*काफियारंभ गझल*
*💐प्रतीक💐*
आधाराचे प्रतीक असते म्हणजे बाई
सौभाग्याचे प्रतीक असते म्हणजे बाई
रीत मुलांना बालपणी ती लावत असते
संस्काराचे प्रतीक असते म्हणजे बाई
आल्या गेल्या सर्वांचे ती सदैव करते
कर्तव्याचे प्रतीक असते म्हणजे बाई
मायेने ती घरातल्यांची कामे करते
वात्सल्याचे प्रतीक असते म्हणजे बाई
गरीब गरजू लोकांसाठी सदा धावते
कैवल्याचे प्रतीक असते म्हणजे बाई
शोभा वागळे
मुंबई.
०८/०३/२०२२