You are currently viewing अर्धांगिणी

अर्धांगिणी

मालवणचो कट्टा प्रतिष्ठानची सक्रिय सदस्या… लेखिका कवयित्री सौ दीप्ती प्रवीण बोवलेकर(खानोलकर) यांची अप्रतिम काव्यरचना

आहेस माझी तू अर्धाँगिणी
सुखी संसाराची माझ्या तू सहचारिणी.!

सप्तपदी चालुन आलीस तु माझ्यासवे
सगळे तोडूनं तुझ्या आप्तेष्टांचे ऋणानुंधागे .!

विश्वास तुझा माझ्यायवर स्वत:हून अधिक
प्रेमाने जपतेस माझ्या इच्छा आकांशाचे गणित !

होतीस तेव्हा तुझ्या आईबाबांची तान्हुली
उंबरठा ओलांडताच सासरचा झाली तू माऊली .!

सर्वांच्या अपेक्षांचे ओझे घेतलेस खांद्यावरी
जबाबदारीने वागतेस माझ्या गं राणी !

संस्काराचा तुझ्या एक-एक पैलू तू दाखविला
थोरा मोठ्यांचा आशीर्वादाने संसार रंगविला !

शाबासकीने थोपटत नाही पाठ तुझी कोणी
चुकीत होते माञ कानउघडणी तुझी !

रुप तुझे सुंदर गं ,नाही कौतुक कोणास
तुझ्यापुढे आहे माञ ती इंद्राची अप्सरा भकास !

स्वयंपाकात तुझ्या ञुटी न कोणी काढावी
अन्नपुर्ण मातेंने दिली तुला पुर्णब्रम्हांची शिदोरी !

दु:खात माञ घेत नाहीस तू कधी माघार
खांद्याला खांदा लावून देते मला आधार!

रुप जरी साधं पण बुध्दीचं चातुर्य
भावी पिढी समोर ठेवेंन तुझाच आदर्श !

करतो तुझ्यासवे मी संसार वर्षानुंवर्षाचा
हिच दे पत्नी जन्मोजन्मी गणपती गजानना !

प्रेम आहे तुझ्यावर अगदी आभाळभरूनं
सांगता येत नाही म्हणूंन व्यक्त होतो शब्दातून !

चुल-मुल सांभाळून राणी करतेस संसार
तूच गं माझ्या अंतापर्यंतचा एकमेव आधार !

सांगु तरी कसे ?बोलू तरी कुणाला ?
हृदय माझे चिरताच दिसेल त्यात चेहरा तुझा !

अहंम् भाग्य माझे तू लाभली माझी पत्नी मला
पुन्हा:एकदा घालेनं तुझ्याच गळ्यात माळा !

रागे भरता आणतेस डोळ्यात टचकन पाणी
गाल फुगवूनं बसता दिसतेस नाजुक नवतरुणी .

नको मला तुझ्याविना अन्य दुसरी कोणी
तुचं व्हावीस माझ्या जन्मोजन्मीची पट्टराणी !

देवाघरी तू जा प्रथम मी देईंन तुला सल्ला
शेवटच्या त्याक्षणी सुध्दा पाहायचे सुवासिनी तुला !

नसेल माझी अर्धांगिणी गोरीपानं रुपसुंदरी
आहे ती माझ्या संसाराची खरी ऐश्वर्यलक्ष्मी !

#धन्यवाद
#सौ .दिप्ती प्रविण बोवलेकर (खानोलकर) .(वेंगुर्ला)

प्रतिक्रिया व्यक्त करा