जागतिक साहित्य विकास मंच सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ यांनी जागतिक महिला दिना निमित्ताने लिहिलेली अप्रतिम काव्यरचना
ईथे तिथे तिची
उंच उंच भरारी असते
पाऊल पुढे टाकल्यावर
ती माघारी होत नसते
वाट अवघड आसली
तरी तिला कसलीच
भिती वाटत नाही
गरूड झेप घेताना
स्वप्नांची गती ती
थांबवत नाही
सन्मान तिचा होत नसला
तरी ती अपमानाची पर्वा
करत नसते
आलेत अडथळे कितीही
तरी ती सावधपवित्रा घेत असते
आता ती कुठेही मागे नाही
जिथे जाईल तिथे
तिचा सहभाग असतो
खांद्याला खांदा लावून
तिचाही पुढाकार दिसतो
अशक्य तिला काहीच नाही
शक्य करण्याची हिंमत
तिच्यात आली आहे
स्वकर्तुत्वाने लढण्यास
ती सज्ज झाली आहे
कितीही घायाळ झाली
तरी ती कुठेही थांबत नाही
ध्येयसिद्धीचा ध्वज हातात घेवून ती
आत्मसन्मानाला झुकू देत नाही
शिल सय्यम संस्कार
त्यागाची ही सुंदर मूर्ती
स्वतःसाठी कमीनी्
परिवारासाठीच जास्त जगते
दिव्याची वात ही
घरात उजेड देता देता
आयुष्यभर जळत आसते
म्हणून…
नको पायात तिच्या
बंधनाची बेडी
तीलाह गगन भरारी
घेवू द्या
छत्रपतींच्या स्वराज्यातील
या जिजाऊंच्या लेकींना
एक नवा इतिहास लिहू द्या
*संजय धनगव्हाळ*
धुळे
९४२२८९२६१८