You are currently viewing व्यावसायिक शिक्षण घेऊन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी “गरुडझेप” घ्यावी – दत्तात्रय भडकवाड

व्यावसायिक शिक्षण घेऊन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी “गरुडझेप” घ्यावी – दत्तात्रय भडकवाड

एस.एस.आय कॉम्प्युटर संस्थेच्या कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन…

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून अनेक रोजगार निर्माण होत आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण एस.एस.आय कॉम्प्युटर या संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास केंद्रातून घेऊन येथील विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात गरुड झेप घ्यावी, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी आज येथे केले. दरम्यान या संस्थेत शिकलेले विद्यार्थी जगाच्या पाठीवर कुठेही कमी पडणार नाही, यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून भविष्यात आपला प्रवास जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरेल, यादृष्टीने प्रयत्न करावा, असे असेही ते यावेळी म्हणाले. एस.एस.आय संस्थेचे संचालक रघुनाथ तानावडे यांच्या पुढाकाराने सावंतवाडीत सुरू करण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन आज श्री.भडकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, माणगाव विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विजयप्रकाश आकेरकर, सांगुळवाडी वैभववाडी महाविद्यालयाचे सचिव संदीप पाटील, शिरोडा येथील वी.स. खांडेकर विद्या प्रतिष्ठानचे सी.जी. ओटवणेकर, सुकळवाड एम.आय.टी.एम काॅलेजचे सूर्यकांत नवले, अण्णासाहेब भोसले, डॉ. राजेश नवांगुळ, दिनेश नागवेकर, दत्ता सावंत, राजन पोकळे, अन्नपूर्णा कोरगावकर, उत्कर्षा सासोलकर, आनंद नेवगी, संजू शिरोडकर, प्रतीक बांदेकर, विशाल सावंत, सिनेरा अल्मेडा, प्रतीक्षा कांबळे, कविता नाईक, सुखदा नाईक, सोनाक्षी मेस्त्री आदींसह मोठ्या संख्येने सर्व क्षेत्रातील मान्यवर व हितचिंतक उपस्थित होते.

श्री. भडकवाड पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी गरुडाचे गुण आपल्या अंगात बणवावेत. इतर पक्ष्यांप्रमाणे पावसाळ्यात घरट्याचा आधार घेत न बसता गरुडासारखी उंच भरारी घेऊन ढगांच्यावर जाऊन पावसाचा आनंद लुटता आला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी एस. एस. आय कम्प्युटर या संस्थेचा आधार घ्यावा, व आपला सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले. तर या संस्थेतून शिकून जगाच्या पाठीवर कुठेही कमी पडणार नाही, अशी छाप पाडा, असेही आवाहन त्यांनी संस्थेच्या प्रमुखांना केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा