*महिला दिनानिमित्त पार पडलेल्या कार्यक्रमात महिलांना कायदेविषयक तसेच व्यवसायिक मार्गदर्शन केले*
कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुडाळ येथील दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश सौ.अश्विनी बाचुलकर उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमासाठी मार्गदर्शिका म्हणून विधीज्ञ सौ.राजश्री नाईक, विधिज्ञ कु.उमा सावंत, दिवाणी न्यायालय कुडाळ व व्यवस्थापन अधिकारी, प्रभाग समन्वयक, तालुका अभियान कक्ष कुडाळ होते.
दिवानी न्यायालय कुडाळ येथे पार पडलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात महिलांना कायद्याचे शिबिरात्मक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच स्त्रियांना उपजीविकेचे साधन म्हणून व्यावसायिक प्रशिक्षण बाबत श्री.गणेश राठोड यांनी मार्गदर्शन केले. विधिज्ञ सौ.राजश्री नाईक यांनी महिलांना आत्मनिर्भरता व आत्मविश्वास निर्माण करणारी कायद्याची चौकटी याबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे विधिज्ञ कु.उमा सुहास सावंत यांनी शासकीय कार्यालयात स्त्रीचे महत्व, होणारे लैंगिक शोषण व अत्याचाराला बळी न पडता त्यांचे कायद्यांतर्गत संरक्षण करणाऱ्या बाबी यांना वाचा फोडणारे मार्गदर्शन केले.
महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कार्यालयाचे प्रतिनिधी आर्या अडुळकर, श्री. सिताराम सावंत व श्री. गौरव कुबल व सहाय्यक अधीक्षक सौ. संपदा जाधव यांचे उत्तम सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालयाच्या प्रतिनिधी आर्या अडुळकर वरिष्ठ लिपिक, दिवाणी न्यायालय, कुडाळ यांनी केले.