उद्या पारितोषिक वितरण
नांदगाव प्रतिनिधी
असलदे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धा उत्साहात संपन्न झाले आहे.यात पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, तसेच नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सकाळी ठीक ११ वा.पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे.तसेच यावेळी हळदीकुंकू व संगीत खुर्ची होणार आहे.विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
नेत्र तपासणी शिबिर साठी गद्रे रुग्णालयातील डॉ.अश्विनी म्हेत्रे व त्यांचे कर्मचारी मानसी शेडगे, विकास चव्हाण, दशरथ आक्के,दिव्या नेरुरकर,स्वरात क्रिजे यांनी मोफत सेवा दिली त्यात ७४ लाभार्थ्यांनी तपासणी केली आहे.यावेळी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता तपसे, आरोग्य सेविका सौ. मराठे,समुदाय आरोग्य अधिकारी सौ.कदम तसेच पंचायत समिती सदस्या सौ हर्षदा वाळके, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर,उपसरपंच संतोष परब,ग्रामसेवकआर.डी . सावंत , ग्रामपंचायत सर्व सदस्य आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक जंगले, मुख्याध्यापक सुरेखा सावंत ,सौ.मसुरकर ,सानिका तांबे आदी उपस्थित होते.