You are currently viewing वैभववाडी तालुक्यात काँग्रेसचा मेळावा व सदस्य नोंदणी शुभारंभ….

वैभववाडी तालुक्यात काँग्रेसचा मेळावा व सदस्य नोंदणी शुभारंभ….

वैभववाडी तालुक्यात काँग्रेसचा मेळावा व सदस्य नोंदणी शुभारंभ आज झाला. जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा काँग्रेस प्रवक्ता उपाध्यक्ष इर्शाद शेख, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत, काँग्रेस सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीण वरूनकर, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी तालुक्याचा काँग्रेसचा भरगच्च मेळावा वैभववाडी तालुक्याचे तालुका अध्यक्ष दादामिया पाटणकर, महिला तालुकाध्यक्ष सौ. मीनाताई बोडके, युवक तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, सेवादल तालुकाध्यक्ष अशोक राणे, काँग्रेस नेते आनंदा पवार, तालुका उपाध्यक्ष वसंत नाटेकर, जिल्हा कमिटी सदस्य दादा नेवरेकर, दिलीप रावराणे, सौ. प्राची रावराणे, ओमकार हरयाण आदिं सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळा पांचाळ यांनी केले..

जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी येत्या जिल्हा बँक, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकांसाठी कामाला लागा त्याचप्रमाणे वैभववाडी तालुक्यात काँग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी जास्तीत जास्त करावी व उर्वरित राहिलेल्या भूत कमिट्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात आणि येत्या निवडणुकांसाठी सामोरे जाण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अशा सूचना दिल्या. तालुका अध्यक्ष दादामीया पाटणकर यांनी वैभववाडी तालुक्यातील बूथ कमिटी सदस्य नोंदणी काँग्रेस वाढीसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत वैभववाडी तालुक्यातील गावांचा दौरा कार्यक्रम लवकरात लवकर सुरू करणार असल्याचे सांगितले… जिल्हा प्रवक्ते इर्शाद शेख, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, सरचिटणीस महेंद्र सावंत, प्रवीण वरूनकर, भालचंद्र जाधव, मीनाताई बोडके, समीर वंजारी यांनी आपले विचार मांडले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तालुका उपाध्यक्ष वसंत नाटेकर यांनी केले..

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × five =