वेंगुर्ला :
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मंगळवार दि.८ मार्च रोजी दुपारी ३.३० वा. परुळे युवक कला क्रीडा मंडळाच्या महिला विभागाकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
*मनोरंजक खेळातून तणावमुक्ती* हा माहिलांसाठीचा विशेष कार्यक्रम
मार्गदर्शक – कु. पियुशा तेंडोलकर, प्राध्यापिका – मानसशास्त्र विभाग, बॕ.नाथ पै महाविद्यालय कुडाळ. सहभागी महिलांसाठी लकी ड्राॕ द्वारे आकर्षक बक्षिस जिंकण्याची संधी
🔆 सायं.५ वा. –
*पाककला स्पर्धा*
विषय- विस्तवाशिवाय तयार केलेला पदार्थ
🔹ही पाककला स्पर्धा परुळे मर्यादित असून परुळ्यातील महिला या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
🔹प्रथम नावनोंदणी करणा-या १२ महिला स्पर्धक स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
🔹स्पर्धेसाठी आवश्यक सामान स्पर्धकाने स्वतः आणावयाचे आहे.
🔹पदार्थ स्पर्धेच्या ठिकाणी दिलेल्या वेळेत तयार करायचा आहे.
🔹तयार केलेला पदार्थ जंकफूड नसावा.तो पौष्टिक असावा. त्याचा शरीरास काय फायदा होतो हे माहित असणे आवश्यक आहे.
🔹नाव नोंदणी साठी संपर्क क्रमांक-
सौ.रश्मी सामंत – मो.9422269399
*बक्षिसे*
प्रथम क्रमांक – *ईलेक्ट्रिक शेगडी*
व्दितीय क्रमांक- *मिक्सर*
तृतीय क्रमांक- *प्रेशर कुकर*
उत्तेजनार्थ – *आपे मेकर*
*मंगळवार दि. ८ मार्च २०२२*
*स्थळ – वराठी मंगल कार्यालय परुळे बाजार*