राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदयजी सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे.कोरोनाच्या कालावधीत राज्यातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सातत्याने गेले 6 महिने ते धडपडत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या कालावधीत विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी त्यांनी प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा देखील रद्द केल्या आहेत.तसेच अंतिम वर्षाच्या परीक्षा देखील रद्द करण्यासाठी प्रयत्न केले परंतु काही नियमावलीमुळे सदर परीक्षा घेण्याचे निर्देश राज्यांना देण्यात आल्यामुळे त्या परीक्षा घेण्यात येत आहेत.त्या परीक्षा घेतानाही विद्यार्थ्यांचा कोरोनापासून बचाव व्हावा, विद्यार्थ्यांना परीक्षेचे दडपण येऊ नये यासाठी ना.उदय सामंत यांनी यशस्वीरीत्या नियोजन केले आहे. आपल्या पदाला न्याय देण्यासाठी कोरोनाच्या कालावधीत त्यांना अनेक वेळा राज्याचे दौरे करावे लागले.विविध ठिकाणी भेटी देऊन तेथील प्रश्न सोडविण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने त्यांनी जिल्ह्यात अनेक वेळा उपस्थित राहून जिल्ह्यातील प्रश्न सोडविले तसेच कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांना जिल्ह्यात उत्तम उपचार मिळावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.जिल्ह्यात आरोग्य विषयक अनेक सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या.परंतु ही जबाबदारी पार पाडत असताना कळत नकळतपणे त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आमचे सहकारी, मार्गदर्शक उदयजी सामंत लवकरच कोरोनावर मात करून लोकांच्या सेवेत रुजू होतील.ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना
कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार तथा जिल्हाप्रमुख-शिवसेना सिंधुदुर्ग चे वैभव नाईक यांनी केली आहे.