शेर्पे सारख्या ग्रामीण भागात केंद्र शाळा शेर्पे ही उच्च प्राथमिक शाळा कार्यरत असून, केंद्रशाळा शेर्पे येथे जवळच्या ३ गावातून विद्यार्थी शाळेत येत आहेत .केंद्रशाळा शाळा शेर्पे चा बहुतांशी पालक वर्ग हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा आहे .शाळेतील मुलींची संख्या सुद्धा चांगली आहे .पूर्वी शाळेमध्ये दोन मुलींना सावित्रीबाई दत्तक पालक योजनेचा लाभ दिला जात होता .शाळेचे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे यांनी गावातील दानशूर पालकांना आव्हान केले की, सावित्रीबाई दत्तक पालक देणगी योजनेतून मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाला अखंड हातभार लावता येईल .केंद्रशाळा शेर्पेच्या मुख्याध्यापकांनी केलेल्या आव्हानाला तात्काळ प्रतिसाद देवून शेर्पे गावच्या सरपंच निशा भास्कर गुरव यांनी आपले वडील कैलासवासी श्यामसुंदर भास्कर शेलार यांच्या स्मरणार्थ देणगी देऊन सुरुवात केली .त्याचबरोबर विनोद एकनाथ शेलार – पोलीस पाटील शेर्पे यांनी आपले वडील कैलासवासी एकनाथ शिवाजी शेलार यांच्या स्मरणार्थ देणगी दिली .शाळेचे मुख्याध्यापक दशरथ भिकू शिंगारे यांनी सुद्धा आपले वडील कैलासवासी भिकू बाबू शिंगारे यांच्या स्मरणार्थ देणगी दिली . मुख्याध्यापकांच्या विशेष प्रयत्नातून प्रवीण रघुनाथ बेळणेकर – (माजी विद्यार्थी )यांनी आपली आई कैलासवासी अशालाता रघुनाथ बेळणेकर यांच्या स्मरणार्थ तर परशुराम हरिश्चंद्र बेळणेकर यांनी आपले वडील कैलासवासी हरिश्चंद्र बाबू बेळणेकर यांच्या स्मरणार्थ देणगी दिली . सर्व देणगीदारांनी प्रत्येकी ३००० / -रुपये याप्रमाणे एकूण १५ o o o / – रुपये सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडे जमा केलेआहेत .या रकमेतून दर वर्षी आलेल्या व्याजातून केंद्रशाळा शेर्पेच्या ५ मुलींना शैक्षणिक गरजान करिता देणगी स्वरुपात लाभ होणार आहे .या सर्व देणगीदारांनी दिलेल्या देणगी बद्दल विशेष कौतुक रवींद्र जठार माजी वित्त व बांधकाम सभापती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी केले .तर सर्व देणगीदार व देणगी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या केंद्रशाळा शेर्पे च्या मुख्याध्यापक व शिक्षक यांचे अभिनंदन कणकवली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी किशोर गवस ,तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे , केंद्रप्रमुख शेर्पे सद्गुरु कुबल ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास पांचाळ यांनी केले .
सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेसाठी केंद्रशाळा शेर्पेला ५ देणगीदारांची देणगी
- Post published:मार्च 4, 2022
- Post category:बातम्या / वैभववाडी
- Post comments:0 Comments