You are currently viewing जुगारी भरवतात क्रिकेट स्पर्धा आणि नाटक

जुगारी भरवतात क्रिकेट स्पर्धा आणि नाटक

*जुगाराच्या मैफिलीचे फोटो संवाद मीडियाकडे*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेले जुगार हे रोज नवनवीन पद्धतीने मैफिली सजवत असतात. गेली काही वर्षे जागा बदलून लपून छपून चालणारे जुगार आता नव्या स्वरूपात जिल्ह्यात सुरू असणाऱ्या नाटक व तरूणाईचा भरणा असलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या आडून सुरू आहेत. रात्री मोठ्या प्रमाणावर जुगाराचे पट बसतात. जुगाराच्या मैफिलीचे फोटो जागृत नागरिकांनी संवाद मीडियाकडे पाठवले आहेत. जुगाराच्या मैफिलीचे फोटो संवाद मीडियाकडे आले असूनही संवाद मीडियाच्या बातमीनंतर खाकी वर्दी कडून वरिष्ठांना जुगार बसलें नसल्याचे कळवले जाते. त्यामुळे खाकी वर्दीचे पेट्रोलिंग एक संशोधनाचा विषय बनला आहे. मॅनेज करून जुगारी क्रिकेट सामने व नाटके आयोजित करतात. क्रिकेट सामने सुरू असलेल्या ठिकाणी झाडीत किंवा मोठमोठ्या झाडांच्या सावलीत भर दिवसा जुगार बसवले जातात. क्रिकेट सामन्यांना येणारी तरुणाई सहाजिकच जुगाराकडे आकर्षित होते…आणि पैशाच्या हव्यासापोटी अवैद्य धंद्यांकडे वळते. रात्रीच्या वेळी जुगाऱ्यांकडून आयोजन केलेल्या नाटकांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जुगाराचे पट बसवतात. त्यामुळे नाटक पहायला जातो असे सांगत अनेक तरुण पैसे मिळविण्यासाठी जुगाराकडे वळत आहेत. खाकी वर्दीच्या आशीर्वादाने सुरू असलेले जुगाराचे फड कधी बंद होणार असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे. जिल्ह्यात सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांवर क्रिकेट सामन्यांच्या आडून सुरू असणाऱ्या जुगारावर योग्य ती कारवाई पोलिस प्रशासनाने करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करू लागले आहेत. जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यावर नक्कीच कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा