माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून उपक्रम; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन…
बांदा
भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून व सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब आयोजित ५० टक्के सवलतीवर देण्यात येणाऱ्या वॉटर फिल्टर आणि पीठ गिरणी (घरघंटी) वितरणाचा शुभारंभ शहरातील ओवेस कॉम्प्लेक्स येथे जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. बांदा शहरातील जनतेसाठी ५० टक्के कमी किमतीत या वस्तू उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
यावेळी बांदा सरपंच अक्रम खान, उपसभापती शीतल राऊळ, ग्रामपंचायत सदस्य राजाराम सावंत, शामसुंदर मांजरेकर, किशोरी बांदेकर, भाजप महिला शहर अध्यक्ष सौ.अवंती पंडित, तंटामुक्त समिती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, शामराव सावंत, उदय देऊलकर, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, बाबा गाड, दादू कविटकर, प्रवीण पंडित, कुडाळ येथील श्री समर्थ अँक्वा सेल्स अँड सर्व्हिसचे सचिन देसाई, हनुमंत नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी बांदा शहरातील लाभार्थ्यांना फिल्टर व गिरण वितरित करण्यात आली. श्वेता कोरगावकर म्हणाल्या की, भाजपचे नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करण्यात आली असून याचा लाभ शहरवासीयांनी घ्यावा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादू कविटकर यांनी केले. ओवेस कॉम्प्लेक्स येथे ९ मार्च पर्यंत ग्राहकांना सवलतीच्या किमतीत वस्तू वितरित करण्यात येणार आहेत.