भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश समिती प.महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती संस्थापक अध्यक्ष, सांगली जिल्हा अहमद मुंडे यांचा लेख
राजकारण आपल्यापर्यंत आणून पोहचविण्यात वर्तमानपत्र. आकाशवाणी. दूरचित्रवाणी. युटुब चॅनल. यांचाही मोठा वाटा आहे या साधनांद्वारे एकाच वेळी खूप मोठ्या संख्येने लोकांशी संपर्क साधला जातो. रोजचे वृतमानपत्र उघडून पाहिले की त्या देशातील राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक वैद्यकीय घडामोडींची माहिती मिळते एकाच घटनेबद्दल नेते पुढारी आमदार खासदार मंत्री पक्ष यांची मते कशी वेगळी असतात यांचे आपणांस ज्ञान देणारे माध्यम म्हणजे प्रसार माध्यम. कोणत्या बातमीला किती महत्व द्यायचे कोणत्या घटनेला किती महत्व द्यायचे. त्या त्या पत्रकार व वार्ताहर यांचेवर अवलंबून असते. वेगवेगळ्या घडामोडींचे विश्लेषक करणारे लेख त्या घडामोडीवरील भाष्य करणारे अग्रलेख. हे त्या त्या वृतमापत्राचे व पत्रकार वार्ताहर यांचे एक वैशिष्ट्य असते. एखाद्या विशिष्ट विषयांची थोडक्यात आणि साध्या सोप्या भाषेत लोकांना ओळख करून देण्यासाठी चळवळीतील कार्यकर्ते अशा पुस्तिका तयार करतात एखाद्या कार्यक्रमाची किंवा आंदोलनांची माहिती करून देण्यासाठी पत्रकार हे महत्वाचे माध्यम आहे.
आपल्या सिंह स्तंभातील चौथा स्तंभ माणला जाणारा एक समाजांचे आपण काहीतरी देणं लागतो ही भावना मनात घेऊन सापेक्ष. निरपेक्ष. राजकारण विरहित. सामाजिक हितासाठी. भ्रष्टाचारविरोधी. गुंडगिरी दहशतवाद. अवैध धंदे. अश्या विविध प्रकाराने आपली व आपल्या गाव तालुका जिल्हा राज्य देश यामधील जनतेला. चांगल्या वाईट घटना डोळ्यापुढे आणून देण्यासाठी. आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी न करता रांत्र दिवस धावपळ करणारा व्यक्ति म्हणजे एक पत्रकार. वार्ताहर. पण आज ही सर्व माध्यमातील व्यक्तिच्या व त्यांच्या कुटुंबाच्या संरक्षणाचा प्रश्न आ वासून उभा आहे.
लेखणीची धार वज्रा पेक्षाही मोठी आहे कारणं समाजातील आत्महत्या. अपहरण. राजकीय हालचाली. आत्मचरित्र. कवितासंग्रह. मान्यवरांचे आचार विचार. समाजातील लोकांवर होणारें अत्याचार. महिला अत्याचार. शासकीय पांढरे गुंड यांची काम करण्यात होणारी हयगय. ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यामधील विविध नविन विकास योजनांची माहिती. पर्यावरण. अश्या विविध माध्यमांमधून. लिखाण करून समाजाला हुशार करण्याचे काम लेखणी करत असते. लिखाण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं आणि आपल्याला संविधान देण्यात आले आणि त्यानुसार आज सर्व राजकीय. सामाजिक. आर्थिक. शैक्षणिक वैद्यकीय अश्या विविध माध्यम चालविण्याचे आपणांस ज्ञान दिलें ही ताकद लेखणीच्या धारेवरच आहे
समाजांचा घटक म्हणून काम करणारे वार्ताहर पत्रकार. हे आज विविध योजनेतील घोटाळे. मग ते आर्थिक असो किंवा सामाजिक असो राजकीय दबाव. शासकीय पांढरे गुंड यांची कर्तबगारी ही समाजाच्या पुढ आणतात पण त्याचा खरोखरच समाजाला काय उपयोग होता का. समाज एक दिवस वाचतो बघतो आणि आरे आरे काय भयानक आहे एवढेच म्हणतो आणि विसरून जातो पण ज्या वार्ताहरांनी पत्रकारांनी हे सर्व बोगस घोटाळे बाहेर आणले. त्यांचा आपण कधी विचारच करत नाही. आणि मग वाळू माफिया. स्टोन क्रशर. विट भट्टी. अवैध जंगलतोड. दारू भट्टी ही सर्व शासनाची संपत्ती आहे त्यासाठी शासन विहित निलाव काढून कोणत्या ठिकाणी किती उत्खनन करण्याचे किती ब्रास उत्खनन करण्याचे त्यासाठी शासन निर्णयानुसार किती रक्कम भरायची हे विहित निर्बंध घातले
जातात आणि त्यानुसार उत्खनन सुरू केले जाते. जर शासनाने १००० हजार ब्रास वाळू माती दगड उत्खनन करण्याचा परवाना दिला असेल तर तेथे २००० हजार ब्रास अवैध उत्खनन केले जाते यासाठी संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचारी. तहसिलदार. प्रांत ग्रामसेवक तलाठी मंडलधिकारी. यांच्याशी लाच देऊन. जेवन दारू पार्ट्या करून शासनाची फसवणूक करण्यास शासकीय पांढरे गुंड सामिल आहेत हे खरे म्हणजे कुंपणच शेत खातय मग राखण कोण करणार आणि आपला विहित आर्थिक वाटा नाही मिळाला की म्हणायचं माझ्या अंगावर गाडी घातली. शिव्या दिल्या. माराहान केली. जीवे मारण्याची धमकी दिली. असे विविध फसवे आरोप करायचे म्हणजे. नवसो चूवे खाके बिल्ली चली हाज को. किती भयानक आहे बघा. यांना सगळीकडून संरक्षण आहे. कारणं शासकीय पदांची उब यांना चांगलीच आहे
आपला जीव धोक्यात घालून अश्या बोगस प्रकरणांचा उलगडा जर एखाद्या पत्रकार वार्ताहर यांनी केला तर त्यांच्याकडे अवैध धंदे करणारे यांची कायम करडी नजर असते. हा आपल्या विरोधात लिहतो काय. याला बघायला लागतंय. मग काय माराहान. जीवे मारण्याची धमकी. उचलून नेणे. डांबून ठेवणे. दिवसाढवळ्या गोळ्या घालणे. अंगावर रॉकेल ओतून जीवंत जाळण्याची प्रकरणे सुध्दा आपण बघितली आहेत. घरचे राशन बंद करणे. पाणी पुरवठा बंद करणे. लाईट बंद करणे. रस्त्यात अडवून दम देणे. असा नाहक त्रास दिला जातो. काय चूक आहे यांची समाजातील बोगस कारभार रस्त्यावर आणला एवढाच ना. आणि आपण सर्वांनी एक गोष्टीचा विचार केला आहे का. आजपर्यंत पत्रकार वार्ताहर यांचेवर जेवढे प्राणघातक हल्ले झाले ते कसे झाले असतील. ग्रामीण भागात ग्रामपंचायत आणि शहरांत तहसिलदार कार्यालय. आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी. हे सर्व आपलेच व समाजातील सर्व घटकांचे सेवक आहेत ही भावना मनात घेऊन आपण आपल्या विविध अडचणी आपल्यावर झालेला अन्याय. विविध सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय आर्थिक प्रश्न यांचे पुढं मांडतो. का आपणांस न्याय मिळेल ही अपेक्षा करतो. असाच विचार मनांत घेऊन आमचें विविध चॅनल चे पत्रकार. वृतमापत्राचे वार्ताहर. युटुब ट्विटरवर युटुब चॅनल. लोकल चॅनल. शासनमान्य चॅनल. अश्या विविध प्रसार माध्यमातील बांधव सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना संबंधित बोगस प्रकरणाबाबत कळवितात आणि आपले कर्तव्य पूर्ण करतात आणि तेथून पुढे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे कर्तव्य आहे पण ते पूर्ण करतात का नाही हे पांढरे गुंड त्या त्या विभागात अवैध धंदे करणारे आणि ज्यांचे कडून हे पैसे खातात त्यांना फोन करून सांगतात की अमुक व्यक्तिने तुमच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आणि मग काय हे वाळू दगड माती दारू. असे अवैध धंदे करणारे. त्या बोगस प्रकार बाहेर काढणारे पत्रकार वार्ताहर यांच्या घरात घुसून त्यांना व त्यांच्या कुटुंबाला माराहान करतात. आणि तुला कोणाला सांगायचे त्याला सांग असा दम दिला जातो म्हणजे आपण ज्याच्यावर रक्षक म्हणून विश्वास ठेवतो तेच आपला घात करत आहेत. म्हणजे जर एखाद्या पत्रकार वार्ताहर यांच्यावर जर आसा कोणताही प्राणघातक हल्ला झाला तर त्या त्या संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर खटला व कायदेशीर कारवाई करण्यात यावी. एवढेच नाही तर वेळपडलयास नोकरीवरून हाकलून देण्यात यावे. संबंधित पत्रकार व वार्ताहर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला तर हल्लेखोर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश संबंधित ग्रामसेवक तलाठी मंडलधिकारी तहसिलदार प्रांत. संबंधित पोलिस निरीक्षक यांनी कारवाई करणे गरजेचे आहे पण आज राजकीय दबाव यामुळे या सर्वांचे हात बांधलेले आहेत. कारणं सर्वत्र चालणारे सर्व अवैध धंदे हे नेते पुढारी आमदार खासदार मंत्री पुढारी यांचें बगलबच्चे यांचेच आहेत.
आज पत्रकारिता एक व्यवसाय झाला आहे. प्रत्येक जण प्रत्येक राजकीय नेत्यांकडे अडकून आहे त्यांने फक्त आणि फक्त नेता आज कुठाय आज काय केलं वाढदिवस. मयताच्या घरच्यांना भेटी. लग्न समारंभ. अशा विविध की ज्याचा समाजाला कोणताही फायदा नाही अशी कामे केल्यावर पूर्ण पेपरचे पान. त्यांच्याच नांवाने रंगवून टाकतात कारणं पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात यांना जेवन भेटवस्तू. पेपरला. न्युज चॅनल यांना जाहिराती. आर्थिक मदत होते पण समाजात काही लोक अशी सुध्दा आहेत की ते आपल्या लेखणीमधून ज्ञानाचा सागर रोज पेरणी करत असतात पण चांगल आपणांस पचत नाही आणि रूचत नाही त्यामुळे अश्या ज्ञान विश्वाचे नाव सुध्दा कुठ दिसत नाही हे चुकीचे आहे. एकादी महिला अत्याचाराची घटना वेळोवेळी दुरदरशन. पेपरवर पहिल्या पानावर ढळक अक्षरात छापलेली असते. म्हणजे आपल्या चॅनल व पेपरचा खप वाढावा यासाठी त्या पिडित महिलेच्या अत्याचाराचे भांडवल करणारे आपणच असतो मला नाही वाटत हे योग्य आहे. म्हणजे मला अस वाटत की पत्रकार व वार्ताहर आपले कर्तव्य विसरले आहेत का
एखाद्या पत्रकार व वार्ताहर यांच्यावर जर हल्ला झाला तर त्यांच्यामागे कोण कोण आपले कर्तव्य म्हणून उभे राहतात विचार करा आज एक पत्रकार विटा शहरातील त्यांच्यावर वाळू माफिया यांनी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने प्राणघातक हल्ला केला आहे. आज तो विटा येथे हल्लेखोरांना त्वरित अटक करा या मागणीसाठी उपोषण सुरू आहे किती वार्ताहर पत्रकार त्याला मदत करायला गेले. विचार करा वेळ आज त्यांच्यावर आहे उद्या तुमच्यावर नाही कशावरून. म्हणूनच आजच एकत्र या. अधिकृत पत्रकार वार्ताहर. अनाधिकृत पत्रकार वार्ताहर खाजगी पेपर. खाजगी युटुब चॅनल. व अन्य सर्व प्रसार माध्यमे. यातील त्या त्या प्रसार माध्यमांकडून नियुक्ती करण्यात आलेला पत्रकार व वार्ताहर यांना सुध्दा सुरक्षेचा समान हक्क मिळालाच पाहिजे. सर्वांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे लिखाण आपला अधिकार आहे आपले लिखाण बातमी समाजाच्या उपयोगाची असावी.
माझ्या एकंदरीत अंदाजानुसार आपल्यात आज ४०९ पत्रकार व वार्ताहार हे अधिकृत आहेत म्हणजे त्यांनाच सुरक्षेचा अधिकार आहे अस नाही. शासनाने हे पत्रकार वार्ताहर यांचेवर वेळोवेळी होणारें हल्ले याची दखखल घेत शासन निर्णय जारी केला आहे त्यानुसार सर्व समाजसेवक. प्रसार माध्यमातील व्यक्ती यांना संरक्षण प्रधान केले आहे पण आज पत्रकार व वार्ताहर यांच्यात एकी नाही प्रत्येक जण आपले आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी धडपडत आहे. त्यामुळे आज जीवघेणे हल्ले यांचे प्रमाण वाढले आहे. आजच एकत्र या आपली समाजाला आपल्या कुटुंबाला जास्त गरज आहे
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९