You are currently viewing एडगांव उपसरपंचपदी श्री. दत्ताराम पाष्टे यांची बिनविरोध निवड…

एडगांव उपसरपंचपदी श्री. दत्ताराम पाष्टे यांची बिनविरोध निवड…

वैभववाडी

आपल्या बरोबरच्या अन्य सहकाऱ्यांना संधी मिळावी म्हणून एडगांव- वायंबोशीचे विद्यमान उपसरपंच श्री. रविंद्र बाळकृष्ण रावराणे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या एडगांव उपसरपंचपदी एडगांव – पाष्टेवाडी येथील ग्रा. पं. सदस्य श्री. दत्ताराम परशुराम पाष्टे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी माजी सरपंच श्री. प्रमोद रावराणे, रवळनाथ विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. सुनिल रावराणे, माजी उपसरपंच श्री. रविंद्र रावराणे, निवडणूक निर्णय अधिकारी श्री. उमेश राठोड, ग्रा. पं. सदस्य सौ. वैष्णवी रावराणे, सौ. प्रज्ञा रावराणे, सौ. सायली घाडी, सौ. चेतना पवार, ग्रामस्थ श्री. योगेश पवार, श्री. सुनिल घाडी, श्री. अविनाश गुरव, श्री. प्रदिप तांबे इ. ग्रामस्थ उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा