You are currently viewing जनसुनावणी आता प्रत्येक तालुक्यात…..

जनसुनावणी आता प्रत्येक तालुक्यात…..

जिल्हास्तरीय जनजागृती व समन्वय समितीने फेब्रुवारी २०२० पासून घेतलेल्या अथक परिश्रमाचे फलीत म्हणून सोमवारी २८ सप्टेंबरला घेण्यात आलेली ई जनसुनावणी रद्द करण्यात आली असली तरीसुद्धा सी आर झेड जनसुनावणीचा फार्स उरकून घ्यायचाच असा जणू जिल्हा प्रशासनाने विडाच उचलला आहे. रद्द झालेली जनसुनावणी तातडीने मंगळवारी २९ सप्टेंबरला सकाळी तालुकानिहाय पंचायत समिती सभागृह – वेंगुर्ला येथे घेण्यात येणार आहे .
सकाळी १० ते ११ – वेंगुर्ला
सकाळी ११ ते १२ – सावंतवाडी
दुपारी १२ ते ०१ – कुडाळ
सावंतवाडी आणि कुडाळ येथे पंचायत समिती सभागृह असतांना वेंगुर्ला येथे त्या तालुक्यातील जनतेला जनसुनावणीला बोलविण्याची आवश्यकता आहे काय ?
सीआरझेड जनसुनावणीच्या नावाखाली जिल्हा प्रशासनाला वेंगुर्ला तालुक्यात कोरोना महामारीचा फैलाव तर करायचा नाही ना अशी शंका घ्यायला आधार आहे. असं असलं तरीही या सीआरझेड जनसुनावणीस आपण सर्वांनी मोठ्या संख्येने वेळीच उपस्थित राहून आपले विचार, आपली हरकत निर्भिडपणे व्यक्त करा असे आवाहन जिल्हास्तरीय जनजागृती समितीने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा