जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य राष्ट्रीय पुरस्कारित लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांची मराठी भाषेचा गोडवा गाणारी काव्यरचना
मराठी मराठी मराठी मराठी
आहे मायबोली असू द्या हो ओठी
मराठीच बोला लिहा मराठीत
अवघेच गाऊ मराठीचे गीत …
मराठी स्मरावी तिज वाखाणावी
महती तिची हो सदोदित गावी
असे प्राण माझा मराठीच सांगा
जोडून ठेवा मराठीचा धागा…
अपरंपार आहे साहित्य मोठे
माऊली मराठी अभिमान दाटे
अभिजात आहे मराठीचे लेणे
मराठी परीस आहेच हो सोने …
अविट किती ती मराठीत गाणी
पोवाडे सुंदर, देखणी लावणी
संगीतनाटक मराठी गायकी
पदे किती छान साऱ्यास ठाऊकी…
शास्रीय संगीत किती ते महान
भागून जाते मनाची तहान
दिनानाथ लता आशा नि किशोरी
किती ते गायक खुमारीच न्यारी…
मराठीचा बाणा मनी बाळगावा
मनी अभिमान सदाच असावा
मराठी आहे हो प्रिय आम्हा, माय
मधाळ अविट दुधावर साय ….
प्रा.सौ.सुमती पवार
नाशिक