You are currently viewing मराठीचे संवर्धन सर्वांची जबाबदारी – उमेश झिरपे

मराठीचे संवर्धन सर्वांची जबाबदारी – उमेश झिरपे

वैभववाडी

मराठी भाषेला शेकडो वर्षांचा इतिहास असून मराठी भाषेवरून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मराठी भाषिक सर्व व्यक्तींनी मराठी भाषेचे संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे असे मत श्री.शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त गिर्यारोहक तथा अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष श्री.उमेश झिरपे यांनी व्यक्त केले.


वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या स्पंदन विभागाच्या उद्घाटन प्रसंगी उमेश झिरपे बोलत होते. यावेळी प्र.प्राचार्य डॉ.बी.डी.इंगवले, श्री.आशिष माने, डॉ.कमलेश चव्हाण, विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. आपली भूमी, संस्कृती आणि भाषा यांची संवर्धन करण्याची जबाबदारी आपलीच असून मराठी भाषेबरोबरच मराठी साहित्य जिवंत ठेवले पाहिजे असे सांगून उमेश झिरपे यांनी अभिनव कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.नामदेव गवळी यांनी केले तर आभार प्रा.संजीवनी पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा