You are currently viewing आमदार वैभव नाईक यांनी चालविली २५ किलोमीटर सायकल

आमदार वैभव नाईक यांनी चालविली २५ किलोमीटर सायकल

इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२२ सायकल मॅरेथॉनमध्ये घेतला होता सहभाग

निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळेत अंतर केले पार

कणकवली येथील कनक रायडर्स सायकल क्लबच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा सायकल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली आज इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२२ या सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये २५ किलोमीटर गटात कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सहभाग घेतला होता.आ.वैभव नाईक यांनी कणकवली ते कनेडी असा २५ किलोमीटर परतीचा प्रवास निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळेत पूर्ण केला.याबद्दल आयोजकांकडून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार काका करंबेळकर यांच्या हस्ते मेडल व सर्टिफिकेट देऊन आ.वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा