You are currently viewing केंद्रीय मंत्री ना. नारायण राणेंची पेंडूर क्लस्टर स्टॉलला भेट

केंद्रीय मंत्री ना. नारायण राणेंची पेंडूर क्लस्टर स्टॉलला भेट

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने प्रगती साधण्याच्या केल्या सूचना

कुडाळ

कोंकण कॉयर महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आलेल्या केंद्रीय सुक्ष्म लघू मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी प्रदर्शनातील स्टॉलना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी मालवण पेंडूर येथील कल्पतरू कॉयर क्लस्टरच्या स्टॉलला भेट देत पाहणी केली. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून अधिकाधिक प्रगती साधा, अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थित संचालकांना केल्या. यावेळी संचालिका अरुणा सावंत, वर्षा मडगांवकर, सुमित सावंत आदी उपस्थित होते.

एम एस एम ई व भारत कॉयर बोर्डच्या माध्यमातून मालवण पेंडूर येथे १ कोटी ८० लाखाचं कॉयर क्लस्टर होत आहे. कल्पतरू कॉयर क्लस्टर या नावाने होत असलेल्या या क्लस्टरचा स्टॉल कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या कोंकण कॉयर प्रदर्शनात सहभागी करण्यात आला आहे. या स्टॉलला भेट देत ना. राणे यांनी संचालकांना सूचना केल्या.
यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस निलेश राणे, कॉयर बोर्डाचे अध्यक्ष कुप्पूरमू, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे सचिव बी. बी. स्वॅईन, खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा