जिल्ह्यातुन 30 एसटी बस सोडण्याचे दिले आदेश
संदेश पारकर यांच्या मागणीला यश
कुणकेश्वर यात्रेला जास्तीत जास्त भाविकांना जाता यावे यासाठी जादा एसटी गाड्या सोडण्यासंदर्भात आज शिवसेना युवानेते श्री.संदेश पारकर यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री.अनिल परब यांची हरकुळ येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी श्री.पारकर यांनी जास्तीत जास्त भाविकांना यात्रेला जाता यावे यासाठी जादा एसटी बसेस सोडण्यात याव्यात अशी मागणी मंत्री श्री.परब यांच्याकडे केली.
या मागणीची मंत्रीमहोदयांनी त्वरीत दखल घेऊन कुणकेश्वर यात्रेला 30 एसटी बसेस सोडण्याचे आदेश परिवहन विभागाला दिले. त्यानुसार आता देवगड आगारातून 8, कणकवली 8, मालवण 6 विजयदुर्ग 3, तळेबाजार 1 वैभववाडी 1, जामसांडे 1, फोंडा 2 अश्या एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत.
संदेश पारकर यांच्या या मागणीला त्वरीत यश मिळाल्याबद्दल कुणकेश्वर ट्रस्ट आणि भाविकांमधुन समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच परिवहन मंत्री अनिल परब आणि शिवसेना नेते संदेश पारकर यांचे विशेष आभार मानले.