परुळे/ प्रतिनिधी :
जि. प. केंद्रशाळा परुळे नं. ३ येथे दि. २२/०२/२०२२ रोजी १११ वर्षे पूर्ण झाली. या एकशे अकरा वर्षांच्या कालावधीत शेकडो विद्यार्थ्यांनी या शाळेत शिक्षण घेतले आहे. शाळेचा *१११ वा वर्धापन दिन* सर्वांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात साजरा करावयाचा मानस होता. मात्र कोरोनाच्या निर्बंधांमुळे हा कार्यक्रम मर्यादित स्वरूपात करण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांचा *वार्षिक बक्षीस वितरण* समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास श्री नीलेश सामंत माजी शिक्षण सभापती जि प सिंधुदुर्ग सरपंच श्वेता चव्हाण, उपसरपंच मनीषा नेवालकर, ग्रा प सदस्य सुनील चव्हाण, तंंटामुक्ती अध्यक्ष प्रसाद पाटकर, माजी सरपंच उदय दाभोलकर, मोहन वाडेकर, शंकर राठीवडेकर, माजी केंद्रप्रमुख धनंजय् चव्हाण, हनुमंत तेली, श्री विलास अनंत गवंडे, अध्यक्ष व श्रीम.सानिका सुहास परुळेकर, उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांजस मुख्याध्यापक समीर चव्हान तसेच शिक्षक दत्तात्रय् म्हैसकर, वैदेही गोसावी, शालिक पाटिल, पालक, विधार्थी आदी उपस्थित होते. कोरोना मुळे शााळा बंद असल्याने काहीच कार्यक्रम झाले नाहीत. त्यामुळे या कार्यक्रम निमिताने मुलांचा गुनगौरव करण्यात आला. कार्यक्रम यावेळी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.