You are currently viewing आंगणेवाडी जत्रेला आलेल्या मुंबईतील भाविकांच्या गाडीला कासारटाका येथे अपघात….

आंगणेवाडी जत्रेला आलेल्या मुंबईतील भाविकांच्या गाडीला कासारटाका येथे अपघात….

मालवण

कुडाळहुन आंगणेवाडीला जाणाऱ्या मुंबईतील भाविकांच्या ओमनी गाडीला कुडाळ- मालवण रस्त्यावरील चौके कासारटाका बावखोल येथील अवघड उताराच्या रस्त्यावर कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव डंपरने धडक दिल्याने अपघात घडला.

या अपघातात ओमनी गाडीचे मोठे नुकसान झाले असून गाडीतील चालक व काही भाविकांना दुखापत झाली. हा अपघात आज सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडला. आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रेसाठी मुंबई येथील ५- ६ भाविक आज सकाळी रेल्वेने कुडाळ येथे उतरले. एसटी बस बंद असल्याने त्यांनी आंगणेवाडीला जाण्यासाठी कुडाळ तेथून खासगी ओमनी गाडी ठरवून ते मालवण आंगणेवाडीच्या दिशेने निघाले.

ओमनी गाडी कुडाळ मालवण मार्गावर चौके कासारटाका उतार रस्त्यावरील एका अवघड वळणावर आली असता समोरून येत असलेल्या कुडाळच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने या ओमनी गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत ओमनी गाडीचे मोठे नुकसान होऊन दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. मात्र धडक दिल्यावर त्या डंपरने घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातात गाडीतील चालकासह काही जणांना दुखापत झाली. यावेळी स्थानिकांच्या मदतीने गाडीतील भाविकांना बाहेर काढण्यात आले. उपचारानंतर या भाविकांनी दुसऱ्या गाडीतून प्रवास करत आंगणेवाडी गाठली.

प्रतिक्रिया व्यक्त करा