You are currently viewing भिकबाळी

भिकबाळी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.रेखा कुलकर्णी यांची अष्टाक्षरी अलंकार काव्यमाला

गोल सोन्याच्या काडीत,
दोन मोती नी लोलक.
अलंकार पुरुषांचा,
भिकबाळीची ओळख.

वैज्ञानिक नि धार्मिक ,
आहे महत्त्व बाळीला.
कानी उजव्या घालावी,
शोभा येई पगडीला.

डुले अग्रभागी कानी,
असे थाट पेशवाई,
कानी घालता तिजला,
दिसे सुंदर जावई.

भिकबाळीचे फायदे,
नेत्रदोष घालवते.
मेंदू तल्लख ठेवून,
एकाग्रता वाढवते.

गणपतीच्या कानात,
म्हणूनीच तिला मान.
आणि हिंदू संस्कृतीत,
दागिन्यात असे स्थान.

रेखा कुलकर्णी ©®
१२/९/२०

प्रतिक्रिया व्यक्त करा