You are currently viewing भाजपा वेंगुर्ले च्या वतीने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तहसीलदार प्रवीण कुमार लोकरे यांना निवेदन …

महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना दाऊद इब्राहिम याच्याबरोबर झालेल्या मालमत्ता व्यवहाराच्या ठपका ठेवून अंमलबजावणी संचालनालय(ED) कडून चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना 3 मार्च पर्यंत कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
*1993 सालच्या मुंबई बॉम्ब स्फोटामध्ये निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या गुन्हेगारांशी संबंधित आर्थिक आणि मालमत्ता व्यवहारात मंत्री नवाब मलिक यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे महाराष्ट्रातील स्वाभिमानी आणि राष्ट्रीय विचारांची जनता हे कदापि सहन करणार नाही. त्यामुळे अशा भ्रष्ट आणि गुन्हेगारांशी संबंधित मंत्री नवाब मलिक यांचा तात्काळ  राजीनामा घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली …*
राष्ट्राच्या सुरक्षेचा आणि अस्मितेच्या दृष्टिकोनातून मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा न घेतल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने आगामी काळात याहीपेक्षा तीव्र स्वरूपाची निदर्शने आम्हाला करावी लागेल याची गंभीर नोंद घ्यावी. असे निवेदनात म्हटले. निवेदनाची प्रत माहिती करीता ……..
1) मान. मुख्यमंत्री, महाराष्ट्र
2) जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग
देण्यात आली .
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा उपाध्यक्ष अॅड सुषमा खानोलकर , जिल्हा का.का.सदस्य वसंत तांडेल – साईप्रसाद नाईक , शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , ता.चिटनीस जयंत मोंडकर , नगरसेविका श्रेया मयेकर , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , किसान मोर्चा जि.सरचिटणीस बाळु प्रभु , अल्पसंख्याक सेलचे रफिक शेख , महिला मोर्चा च्या व्रुंदा गवंडळकर , पुंडलिक हळदणकर , दिपक माडकर , दत्ताराम गावडे इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा