You are currently viewing काय आतां मागू देवा

काय आतां मागू देवा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची श्री गजानन महाराजांचे चरणी प्रार्थना*

काय आतां मागू देवा
एक मागतो तें द्यावे
तुझ्या पुढे येईन तेंव्हा
मन मागते नसावे

तिन्ही ऋतू आयुष्याचे
भरून मांगल्ये तू दिधले
कांही उणे बाकी उरले
कर्म माझेच असावे

शिशिर शैशवाचा असता
पांघरूण माय पित्याचे
तुझी कृपा असल्याविण कां
घर गोकूळ भासावे

ग्रीष्म प्रपंची दाटला
सखी प्रेमाचा ओलावा
पंख प्रीतीचे होते तरीही
हात तुझा न सोडवे

येई वर्षा अमृताची
पुत्र कन्या माये नटवी
नातवंड पाहता भरूनी
रूप तुझे रे आठवे

सडे सुखाचे सांडले
तूच द्यावे मी वेचावे
कसा होऊ उतराई
तूच गुपित सांगावे

तूझ्या पुढे येईन तेंव्हा
मन मागते नसावे

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − sixteen =