जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ रेखा कुलकर्णी यांची अष्टाक्षरी अलंकार काव्यमाला
एक ठसठशीतसा,
आहे दागिना जवळ.
देई शृंगाराला शोभा,
भरगच्च मोहनमाळ.
खरबुजे नक्षीदार,
मणी गुंफले तारेत.
बहुपदरी शोभती,
एक पदक मध्यात.
दोन पेट्या दोन्ही बाजू
वर एकेरी साखळी.
मोहन माळेची घडंण,
मला फार आवडली.
सवे मंगळसूत्राच्या.
गळा भरून सजते,
लग्न समारंभामध्ये,
रूप छान खुलविते.
झाले लक्ष्मीपूजन,
माप ओलांडून आले.
आम्ही दोघांनी जोडीने,
थोरा नमस्कार केले.
माझ्या गळ्यात घातली,
माळ तीन पदराची,
आजी सासूने कौतुके
नातसून मी लाडाची .
रेखा कुलकर्णी ©®
चिंचवड पुणे
सर्व हक्क स्वाधीन
२४/८/२०