“फुलत आहे कविता , बहरत आहे काव्य ,
श्रृंगारितो कवन, पाक्षिक कविकट्टा साकव्य.”
नमस्कार मंडळी ,
२o२o या साली ‘पाक्षिक कवी कट्टा’ ही सुरेख संकल्पना श्री पांडुरंग कुलकर्णी यांच्या मनात आली, साकव्य समूहात ती साकारली गेली आणि मगं साकव्य जनांना तिची सवय लागली. आणि त्या आवडीचा वर्धापनदिन श्री अनिल देशपांडे व श्री दीपक जोशी ह्यांच्या नेतृत्वाखाली अगदी मनापासून साजरा केला गेला. वर्तमानात हा कवी कट्टा एका विशिष्ट स्वरूपात सुरू आहे आणि त्याचे १o प्रयोग एक वेगळाच काव्यानंद देणारे ठरले. ते विशिष्ट स्वरूप असे की फक्त ५ आमंत्रित कवी व्यवस्थित सराव करून कविता सादर करतात आणि प्रत्येक सादरीकरणा नंतर आमंत्रित मा.समीक्षक त्या कवितेचे आणि सादरीकरणाचे रसग्रहणात्मक समीक्षण करतात, उपरांतिक ‘विशेष आमंत्रित अध्यक्ष’ संपूर्ण कार्यक्रमाचे विश्लेषण करतात आणि सरतेशेवटी समीक्षक जाहीर करतात..
उत्कृष्ट कविता व
उत्कृष्ट सादरकर्ता.
*०*
साकव्य कवी कट्ट्याला लाभलेले अध्यक्ष :
१. ज्येष्ठ कवयित्री सुमती पवार
२. डॉ. दयानंद न्यूटन काळे
३. ज्येष्ठ साहित्यिक श्री देवेंद्र भुजबळ
४. ज्येष्ठ कवयित्री मानसी देशमुख
५. ह.भ.प. श्री चंद्रशेखर शुक्ल
६. ज्येष्ठ साहित्यिक श्री पांडुरंग कुलकर्णी
७. डॉ.क्षितिज कुलकर्णी
८. प्रा.संजय कावरे
९. डॉ.राजेश गायकवाड
साकव्य कवी कट्ट्याला लाभलेले समीक्षक :
१. ज्येष्ठ कवी श्री हनुमंत चांदगुडे
२. ज्येष्ठ कवी श्री विजय जोशी
३. ज्येष्ठ साहित्यिका अलका कुलकर्णी
४. ज्येष्ठ साहित्यिक श्री राजेश्वर शेळके
५. ज्येष्ठ साहित्यिका सुनिता पाटणकर
६. ज्येष्ठ कवयित्री स्वाती रत्नपारखी
७. ज्येष्ठ कवयित्री अर्चना मायदेव
८. गझ़लकार प्रथमेश तुगावकर
९. ज्येष्ठ साहित्यिक श्री पांडुरंग कुलकर्णी
१o.श्री अनिल देशपांडे
११. डॉ.स्वाती घाटे
१२. सौ.अंजली मराठे
*०*
या नव्या स्वरूपा मागचे मूलभूत उद्दिष्ट तेच जे ‘साकव्य’ चे. कवितेचा सखोल अभ्यास घडावा व उत्तम सादरीकरणातून ती प्रेक्षकांच्या मना पर्यन्त पोहचावी. कवि सोबत कवितेचा विकास.
*०*
सर्वात मनोरंजक बाब अशी की प्रत्येक भागात उत्कृष्ट ठरलेले कवी/कवयित्री द्वितीय वर्धापनदिनानिमित्त होणाऱ्या भव्य काव्य सामन्यात जबरदस्त प्रस्तुती देतील आणि साकव्य विकास मंचाला मिळणार एक सर्वोत्कृष्ट कवि/कवयित्री!
*०*
तर जाणून घेऊ या..
अंतिम फेरीसाठी आत्ता पर्यंत कोण कोण यशस्वी ठरले.
१. कवयित्री शिल्पा कुलकर्णी
२. कवि संदीप देशपांडे
३. कवि अशोक शहा
४. कवयित्री सुजाता दरेकर
५. कवि विनोद गादेकर
६. कवयित्री डॉ.गौरी जोशी कंसारा
७. कवयित्री जयश्री कुलकर्णी
८. कवयित्री नीता कुलकर्णी
उपांत्य फेरीसाठी यशस्वी…
१. कवयित्री डॉ.निलांबरी गानू
२. कवयित्री संध्या महाजन
३. कवि राजेश नागुलवार
४. कवयित्री अलका कुलकर्णी
५. कवि डॉ.श्रीनिवास आठल्ये
६. कवि शंकर माने
७. कवि बाळासाहेब गिरी
८. कवयित्री आसावरी इंगळे
_आणि ह्या कवि कट्ट्याचे यू ट्यूब प्रक्षेपण सुरळीत पणे संचालित करणारे तंत्रतज्ञ आहे वरिष्ठ इंजिनिअर *श्री मिलिंद पगारे* सर._
*०*
येत्या *२८ फेब्रुवारीला* साकव्य कवी कट्टा पुन्हा सादर होणार; आणि.. कविता एक नवा *काव्यानंद* घेऊन येणार!
येतायं नं.. 😀
🙏🙏
_-संजीव रामचंद्र दिघे_
(कविकट्टा समन्वयक, सूत्रसंचालक)