कृषी विज्ञान केंद्र किर्लोस आणि असगणी ग्रामपंचायत चे आयोजन
शिवसेनेचे बंडू चव्हाण यांच्या माध्यमातून ३० प्रशिक्षणार्थींना कावेरी जातीच्या १५० कोंबडी पिल्लांचे मोफत वाटप
कृषी विज्ञान केंद्र किर्लोस आणि असगणी ग्रामपंचायत यांच्या वतीने असगणी येथे महिलांसाठी तीन दिवसीय कुक्कुट पालन प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सामाजिक भावनेतून आणि प्रशिक्षणार्थींना उद्योगासाठी प्रेरणा देण्यासाठी शिवसेनेचे आडवली मालडी विभागप्रमुख व असगणीचे माजी उपसरपंच दीपक उर्फ बंडू चव्हाण यांनी सहभागी ३० प्रशिक्षणार्थींना कावेरी जातीची १५० कोंबडी पिल्ले मोफत वाटप केली.
कृषी विज्ञान केंद्राचे उपाध्यक्ष व किर्लोस गावचे सरपंच प्रदीप उर्फ बंडू सावंत आणि असगणीचे सरपंच हेमंत पारकर यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना कोंबडी पिल्लांचे वाटप करण्यात आले. ही पिल्ले उपलब्ध करून त्यांचे संगोपन करण्यात सामाजिक कार्यकर्ते संतोष तांबे यांनी मोलाचे सहकार्य केले. या शिबिरात बंडू चव्हाण, बंडू सावंत व आडवली हायस्कुलच्या शिक्षिका सौ. अंजली हेमंत पारकर यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
यावेळी उपसरपंच यशवंत राऊत, माजी सरपंच रामचंद्र राऊत, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुमित्रा कासले, माजी उपसरपंच विद्यमान सदस्य हेमांगी चव्हाण, माजी सरपंच वैभव पारकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कासले, अनुराधा चव्हाण, ग्राम संघाच्या अध्यक्ष रिया पारकर आदी उपस्थित होते.