You are currently viewing शिवजयंतीचे औचित्य साधत सावंतवाडी, गरड तिठा येथील शिवसेना ध्वजाचे नूतनीकरण सोहळा पार पडला दिमाखात

शिवजयंतीचे औचित्य साधत सावंतवाडी, गरड तिठा येथील शिवसेना ध्वजाचे नूतनीकरण सोहळा पार पडला दिमाखात

*आमदार दीपक केसरकर यांची खास भेट*

 

सावंतवाडी हा गेली काही वर्षे शिवसेनेचा गड मानला जात असून गरड विभागात शिवसेनेचे प्राबल्य आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून गरड विभागातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गरड तिठा येथील शिवसेनेच्या ध्वजाचे नूतनीकरण सोहळा आयोजित केला होता. गरड विभागातील शिवसेना शहर उपप्रमुख विशाल सावंत, ज्येष्ठ शिवसेना कार्यकर्ते अविनाश पाटणकर, शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आणि दिपकभाईंचे जवळचे सुजित कोरगावकर आदी सर्व शिवसेना कार्यकर्त्यांनी एकत्र येत हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पाडला.

शिवसेना ध्वज नूतनीकरण कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले सावंतवाडीचे आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुद्दाम वेळ काढून घाईघाईत या सोहळ्यास उपस्थिती दर्शविली व आपल्या छोटेखानी भाषणात सर्वांनी छत्रपती शिवरायांचे विचार मनात रुजवून त्यानुसार कार्य केले पाहिजे असे सांगत सोहळ्यास शुभेच्छा दिल्या. त्यांच्या समवेत शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ हे देखील उपस्थित होते. ज्येष्ठ शिवसेना कार्यकर्ते अविनाश पाटणकर यांच्या हस्ते आमदार केसरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आमदार दीपकभाई केसरकर यांच्या येण्याने कार्यक्रमास अक्षरशः परिसस्पर्श झाला अशा भावना गरड विभागातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

शिवसेना ध्वज नूतनीकरण व शिवजयंतीच्या निमित्ताने यावेळी दशावतारी नाटक पार पडले. कोकणची ओळख असणाऱ्या दशावतारी नाट्य प्रयोगासही भरभरून प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास गरड विभागातील सर्व शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा