तर दुसरे स्वीकृत संचालक पदी कुडाळचे प्रकाश मोर्ये यांची निवड
ओरोस :
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालक पदी भाजपा आमदार नितेश राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.आज जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. तसेच दुसरे स्वीकृत संचालक म्हणून कुडळाचे प्रकाश मोर्ये यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी या बैठकीस उपाध्यक्ष अतुल काळसेकर, गजानन गावडे, महेश सारंग, निता राणे, विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण, व्हिक्टर डांटस्, समीर सावंत, सुशांत नाईक, आत्माराम ओटवणेकर, रवी मंडगावकर, विद्या प्रसाद बांदेकर, मेघनाथ धुरी, बाबा परब आदी संचालक बैठकीस उपस्थित होते. निवड झाल्यानंतर भाजपा पदाधिकार्यांनी आम. नितेश राणे व प्रकाश मोर्ये यांचे अभिनंदन केले.