You are currently viewing धन्य ते गुरु शिष्याचे नाते

धन्य ते गुरु शिष्याचे नाते

*शिवशाहीर पद्मभूषण बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांचे गुरू स्व.दत्तोपंत माजगावकर यांचे स्नेहसंबंध उलगडले आहेत लेखिका सौ.राधिका (माजगावकर ) पंडित यांनी…*

 

*धन्य ते गुरु शिष्याचे नाते*

माझे परमपूय वडिल ति. स्व. दत्तोपंत सखाराम माजगांवकर हे सुप्रसिद्ध इतिहासकार शिवशाहीर पद्मभूषण श्री बाबासाहेब पुरंदरे यांचे मुलांच्या भावस्कूलमधले आदरणीय शिक्षक होते. पुण्यभूषण मासिकांत यांनी आवर्जुन आपल्या सरांचा म्हणजे माझ्या वाडिलांचा मानाने उल्लेख केला आहे. श्री. बाबासाहेबांसारखा थोर माणूस आपल्या गुरुंना इतक्या वर्षांनंतर मानवंदना देतो. केवढी ही गुरुनिष्ठा आणि गुरुवरील श्रद्धा. सारं जग श्री. बाबासाहेबांपूढे मान देऊन झुकत. आणि जगाची मानवंदना घेणारे हे शिवशाहिर. श्री. माजगावकर सरांचं नुसत नांव ऐकल तरी नम्रतेने यांना मानवंदना देतात. केवढी ही शालीनता. आज माझे वडील असते तर ते कृतकृत्य झाले असते. आणिश्री बाबासाहेबांनी पण, कुठल्याही कार्यक्रमाला निघतांना पहिला मानाचा मुजरा सर्वप्रथम आपल्या सरांनाच केला असता शिवाजी राजांची अढळ श्रद्धा आपल्या गुरुवर श्री समर्थ रामदास स्वामीं वर होती. तितकीच श्रध्दा हया शिष्याची आपल्या गुरुंवर अजूनही आहे. जगापुढे शिवरायांचा आदर्श मांडणारे इतिहासकार शिवशाहिर श्री बाबासाहेब आपल श्रेय माननीय सरांनाच देतात. त्यांच्या नम्रतेची, श्रध्देची, गुरुभक्तीची प्रचिती आम्हाला एका प्रसंगानें प्रत्ययास आली. त्याच असं झाल. श्री शरद जोशी हे श्री बाबासाहेबांचे शालेय मित्र होते. आणि त्याच्या सौभाग्यवती म्हणजे माझ्या माझ्या बहिणीची कमलची, जवळची बालमैत्रिण. श्री. शरद जोशी ह्यांची एकसष्टी होती. आणि त्या कार्यक्रमाला श्री बाबासाहेब आले होते.श्री. बाबासाहेबांनी आपल्या कर्तबगारीनें, सुस्वभावाने लोकांची मने जिंकून किर्तीच शिखर गांठलं होत. आणि जनसागरांत मानाच पान पटकावल होत. त्यांना इतका मान अजूनही आहे. त्यांचा प्रवेश झाला. आणि श्री बाबासाहेब आले, असं नुसतं म्हटल्यावरही लोक जागेवरून उठून उभे रहातात. तर सुप्रसिद्ध इतिहासकार असे हे माननीय श्री शरद जोशींच्या ६१ ला आले. होते त्यांच्या उत्साही चपळ कणखर व्यक्तिमत्वानें, आगमनाने त्या कार्यक्रमाला वेगळीच रंगत चढली होती माझी बहिण पण या कार्यक्रमाला हजर होती. सौ.जोशींनी माझ्या बहिणीशी ओळख करून देतांना श्री. बाबासाहेबांना सांगितले” बरं का बाबासाहेब ही कमल माझी मैत्रिण. म्हणजे तुमच्या श्रीयुत माजगांवकर सरांची मुलगी आहे हे रोकताक्षणी श्री. बाबासाहेबांनी काय कराव? ते ताडकन उठले. आणि सौ कमलच्या समोर आलेसमोर उभे राहून त्यांनी तिला मुजरा केला. माझी बहिण गोधळून गेली. कार्यक्रमाला आलेले सगळेच पाहूणे आश्चर्य चकित होऊन बघायलाच लागले.अवघडलेल्या माझ्या बहिणीकडे बघून ते म्हणाले तुमचे वडिल माजगांवकर, “सर म्हणजे माझे सन्मानीय, आदरणीय गुरु आहेत. दुदैवाने ते आता नाहीत. हा मानाचा मुजरा श्री. सरांची मुलगी म्हणून तुम्हाला करतोय. पण हा त्रिवार मुजरा माझ्या श्री माजगावकर सरांसाठी आहे. आणि तो त्यांना पोहोचलाही असेल केवढी ही नम्रता. आणि केवढी ही गुरुभक्ती ती बघून सौ. कमलचे डोळे वडिलांच्या आठवणीनेभरून आले. तर असे होते हे गुरुशिष्याचे अलौकिक अढळ नाते. श्री. बाबासाहेबांना बघण्याची, भेटण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. पण योग येत नव्हता. म्हणून वाईट वाटत होते. आणि अचानक=अचानक तो योग जुळून आला. मला खूप खूप कमालीचा आनंद झाला खूप दिवसापासूनची माझी मनापासूनची इच्छा पूर्ण झाली. फोनवर मी माझी सरांची मुलगी अशी ओळख सांगून. भेटण्याची इच्छा दर्शवली. श्री. माजगांवकर सरांच नाव ऐकून श्री बाबासाहेबांनाही खूपच आनंद वाटला. माझे जावई श्री. सुजित सु· जोशी खूप उत्साही आहेत. त्यांच्या ओळखीने हा सुवर्ण योग आला- ते आम्हांला श्री बाबासाहेबांकडे घेऊन गेले. त्यांच्या बरोबर आमचा फोटो काढला. अतिशय दुर्मिळ आजकाल बघायलाही सापडणार नाही .अशा मोडी लिपीतली, वळणदार, सुरेख सही आम्हाला मिळाली. मी अगदी भाराऊन गेले होते. सारखा मनात विचार येत होता. श्री बाबासाहेबांची ऐतिहासिक वास्तु, त्यांची कर्तबगारी त्यांचा लोकसंग्रह आणि समाजांत मिळवलेला मोठ्ठा मानसन्मान बघायला या पट्टशिष्याचें गुरु ति.माजगांवकर सर माझे वडील आज हवे होते.हया गुरु शिष्याच्या नात्याचा शोध माझा भाचा चि सतीश मुळे लागला होता.शेवटी हात जोडून मी मनात म्हणालें “कालाय तस्मै नमः” निघतांना श्री. बाबासाहेब मला म्हणालें ” सरांचा शालेय जीवनातला फोटो असेल ना तुमच्या कडे? मला तो हवा आहे. मी माझे आत्मवृत्त लिहीतोय. त्यांच्या मुखपृष्टावर मला श्री. माजगांवकर सरांचा फोटो लावायचा आहे. सुदैवाने कोट टोपी धोतर असा फोटो: भाच्याकडून चि. हेमंतकडून मला मिळाला. तो बघितल्यावर श्री. बाबासाहेब प्रसन्न हंसले. चि सतीश माझा भाचा त्याच्या मुळे हया गुरु शिष्य नात्यांचा शोध लागला. आणि चि .सुजित जोशीमूळे मला -श्री बाबा साहेब प्रत्यक्ष भेटले. आणि माझ्याशी प्रेमानें बोलले. तो आनंद तो क्षण माझ्यासाठी मोलाचा होता. अत्यंत मोलाचा.तर असे होते हे गुरुशिष्याचे महान आणि वाखाणण्यासारखं नातं धन्य ती गुरुभक्ती. श्री बाबासाहेब तुम्हांला माझा मानाचा त्रिवार मुजरा.

जय शिवाजी जय भवानी

🙏🏻

लेखिका सौ.राधिका गोपीनाथ (माजगांवकर) पंडित

प्रतिक्रिया व्यक्त करा