You are currently viewing मोगरा फुलला

मोगरा फुलला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालवणच्या आजीव सदस्या लेखिका कवयित्री सौ. आदिती मसुरकर लिखित अप्रतिम ललित लेख*

*🍄मोगरा फुलला🍄*

*मोगरा फुलला*
*पानोपानी बहरला*
*गंधीत पान फुलांनी*
*चोहीकडे दरवळला*

हिरवेजर्द झुडुप शुभ्र तेजस्वी लुकलुकणाऱ्या चांदण्यांची शाल अंगावर पांघरून मोठ्या रुबाबात दारात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याच्या स्वागताला सज्ज झाले होते..…. वाऱ्याच्या मंद झुळुकेसोबत स्मितहास्य करत हे झुडूप मान डोलावत होते . आपला सुगंध चोहीकडे दरवळत संपूर्ण परिसर अल्हाददायी बनवण्याचे महनिय काम हिरवाईने नटलेल्या झुडुपावर उमललेला हा नाजूक टपोरा मोगरा करत होता …..
फुलांनी भरवलेल्या संमेलनात राजा गुलाबराव मस्तकी मुकुट धारण करून हिरव्यागार पानांनी सजलेल्या काटेरी सिंहासनावर बसून रुबाबात डोलत होता.… . तिथे नाजूक जाई जुई या सख्ख्या जुळ्या बहिणी शेजारी शेजारी गप्पा मारत बसल्या होत्या. या बहिणींची थट्टा मस्करी करत , टपोरा मिश्किल मोगरा मात्र पांढराशुभ्र सदरा परिधान करून सेवाभावी वृत्तीच्या माणसाप्रमाणे सर्वांशी खेळीमेळीने वागत होता …. आपल्या सुगंधाने जमलेल्या सर्वच फुलांच्या चेहऱ्यावर हास्य किरणे पसरवत होता …आपल्या अस्तित्वाने सर्वांना मोहित करत होता…. शेवंती , झेंडू ,जास्वंद ,कमळ , लिली, अशा विविध रंगाच्या मनमोहक फुलांनी सजलेल्या या बागेत चैतन्य आणण्याचे काम हा सुवासिक मोगराच तर करत होता….
हा मनमोहक मोगरा कधी फुल झाडांच्या ताटव्यावर , कधी फुलांच्या मंडईत तर कधी साखरपुडा , लग्न समारंभ , डोहाळे जेवण , बारसा प्रत्येक सणसमारंभात मोठ्या थाटामाटात मिरवतो … डोहाळे जेवणात बाळाच्या आईला मुकट, कंबरपट्टा, बाजूबंध इत्यादी नाजूक कलिकांच्या दागिन्यांनी मढवून त्या मातेला देवीचे रूप बहाल करतो… तान्हुल्या बाळाचा मनमोहक गजर्‍याने पाळणा सजवतो … हलके हलके जोजवा या पाळणा गीताच्या लयीत हलकेच झुलवत बाळाला झोपवतो .या मोगऱ्याला मानाचे स्थान प्राप्त झाले ते त्याच्या मनाला धुंद करणाऱ्या सुगंधामुळेच …..
तप्त उन्हाचा मारा सहन करतानाही याला बहर येतो . स्वतः उन्हाचे चटके सहन करत दुसऱ्याच्या जीवनात आनंदाचा बहर कसा आणावा याचा उत्तम धडा हा नाजूक देखणा मोगरा आपल्या वर्तनातून सर्वांना शिकवतो ….दुसऱ्यांना सजवण्यासाठी स्वतःला दोऱ्याच्या गाठीत गच्च बांधून घेतो. .. पण त्याच्पा मुखावर दुःखाचा लवलेशही नसतो .आपल्या सुवासाने सहवासात येणाऱ्या प्रत्येकाचे जीवन सुगंधीत करणे हेच तो आपले परम कर्तव्य समजतो ….. सहज सुंदर आदर्श वर्तनाने परोपकाराचे दर्शन घडवतो…
वर्षा ऋतूमध्ये टप टप पडणाऱ्या पावसाचे थेंब प्राशन करत हा मोगरा हिरवाईने नटतो , सजतो ….. त्याची हिरवीगार गोल गोल पाने पावसाच्या सरींमध्ये चिंब भिजतात . या सरी अंगावर झेलत आनंदाने डोलतात… खेळतात …. . नाजूकसा तो वेल दाटीवाटीने सगळीकडे पसरतो. गगनाच्या दिशेने झेपावतो….या बहरलेल्या सृष्टीमध्ये धरती हिरवागार शालू नेसून नटलेली असते …. त्या नववधूचा साज शृंगार करण्यासाठी हा शुभ्र गंधीत मोगरा पानोपानी बहरतो ….
आपल्या सुगंधाने सर्वांनाच आपल्याकडे मोहित करतो …. नववधूच्या लांब सडक , काळ्याभोर , मऊ मुलायम , रेशमी केसांमध्ये हा टपोरा पांढराशुभ्र मोगरा वेणीत विराजमान होतो …पाहणाऱ्यांच्या नजरा त्या लावण्यवती अप्सरेकडे खिळवून ठेवतो … आपल्या सुगंधाचा दरवळ चोहीकडे पसरवून प्रत्येकाच्या मनात विराजमान होतो … प्रत्येकाची जीवनबाग आपल्या सुगंधाच्या सरीमध्ये चिंब भिजवतो, मन प्रसन्न करून उत्साह निर्माण करण्याचे काम हा मोगरा करतो …..

*स्वप्नवेड्या वेलीवर*
*शुभ्र मोगरा फुलला*
*गंधाळली सांज धुंद*
*मुख चंद्रमा खुलला*

रुसलेल्या प्रेयसीचा , पत्नीचा रुसवा काढताना हा मोगरा वेगळेच रूप धारण करतो … आकर्षक गजऱ्यामध्ये तो स्वतःला सुबक बनवतो…. हळुवारपणे, लाडे लाडे बोलत तो रुसलेल्या पत्नीच्या हळूच कुंतलांमध्ये मोठ्या चतुराईने , चपळतेने जाऊन बसतो….लाडे लाडे एक एक पाऊल पुढे टाकत आपल्या सुगंधाच्या जादूने तिला मोहित करतो … आलेल्या रागाचे , रुसव्याचे रूपांतर प्रेमाच्या हास्य दलांनी फुललेल्या टवटवीत गुलाबात करतो….काही वेळापूर्वी उदास , खिन्न वाटणाऱ्या तिच्या चेहऱ्यावर या सुगंधीत मोगऱ्याच्या जादूने तजेलदार गुलाब उमलतो….
शुभ्र टपोऱ्या या मोतीयाची ओंजळ श्रीकृष्णाच्या चरणावर वाहिली जाते .. त्या विधात्याने निर्मिलेल्या या नाजूक पुष्पांनी कृष्णाची मूर्ती अधिकच तेजस्वी भासू लागते …. कान्हाच्या बासरीतून मधूर सूर निघतात. हे सूर त्याच्या भक्तांना मंत्रमुग्ध करतात… संपूर्ण गाभारा भक्तिमय वातावरणात न्हावून निघतो …..

*यशोदेचा नटखट कान्हा*
*राधेचा कृष्ण मुरारी*
. . *सुगंधात मोगऱ्याच्या बुडून*
*भक्तांसंगे घेई भरारी*

*✒️© सौ. आदिती धोंडी मसुरकर*
*आजीव सदस्य को.म सा प. शाखा मालवण*
*कुडाळ सिंधुदुर्ग*
*Email Id* -aditeemasurkar@gmail.com
*Mobile No -*
9404395563
7744850670

*संवाद मीडिया*

*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️

*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤‍🩹

✴️ *मान्सून ऑफर* ✴️

*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*

https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.

✴️ उत्पादने.

*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*

*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फ‌ँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.

*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*

*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)

*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.

*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.

*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक

*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.

*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*

कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*

🌎 Visit: www.mvetcare.com

*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा