भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती प.महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हाध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख
आपल्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक जिल्हा उप रुग्णालय असतं. सर्व गोरगरीब जनतेला सर्वसामान्य माणसाला सर्वतोपरी वैद्यकीय मदत स्वस्त दरात व कोणताही भेदभाव न करता. सापेक्ष मिळावी यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय असतं
माणूस आज जगात दोनच व्यक्तिसमोर हात जोडतो ते म्हणजे एक डाॅ आणि देव कारणं जन्मला घालण्याचे काम देवांचे पण जीवनात विविध आजारांपासून माणसाला वाचविण्याचे काम जमीनीवरील देवाला दिलें आहे. तालुक्यातील दवाखान्यात. रुग्ण हक्काची सनद. सरकारी दवाखान्यात कोण कोणते उपचार पद्धती अवगत आहे. कोणत्या उपचारासाठी किती पैसे घेतलें जातात किंवा घेतले पाहिजेत यासाठी काय नियमावली आहे का. सर्व आजारांवर उपचार करण्यासाठी त्याप्रमाणे डॉ उपलब्ध आहेत का. बाहेरुन औषध आणणे किंवा बाहेरच्या ओपिडिचा रस्ता रुग्णांना दाखविला जातो कां. सरकारी दवाखान्यात सफाई साठी काय उपाययोजना आहेत. डॉ नर्स मुक्कामाला सरकारी दवाखान्यात असतात का अशा विविध समस्या आज सरकारी दवाखान्यात आहेत त्यामुळे पेशंट सरकारी दवाखान्याला रामराम ठोकतात. आणि. शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या माध्यमातून होणारे उपचार यांना मुकतात. आणि वेळ आणि पैसा वाया घालवत खाजगी दवाखान्यात उपचार करतात. आणि आपली जमापुंजी नाहक खर्च करून बसतात.
माहिती अधिकार कायदा २००५ नुसार सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात चालणार्या कामकाजाची तपासणी पडताळणी करण्याचा अधिकार सर्वसामान्यांना लोकांना आहे. त्यानुसार आपल्या गावात असणार्या सरकारी दवाखान्यात असा कोणताही प्रसंग प्रकार आपल्या निदर्शनास येत असेल तर आजच सरकारने दवाखान्यात माहिती अधिकार दाखल करून आजची दवाखान्याची स्थिती जाणून घ्या.
# आपल्या तालुक्यातील सरकारी दवाखान्याचा गट नंबर व सर्वे नंबर काय आहे ?
# आपल्या तालुक्यातील सरकारी दवाखाना सकाळी किती वाजता उघडतो. दुपारी जेवणाचे टाईंमिंग काय आहे ?
#. सरकारी दवाखान्यात कार्यरत डॉ नर्स संख्या किती आहे ?
#. रोगानुसार डॉ उपलब्ध आहेत का
#. महिन्याला सरकारी दवाखान्याला येणारा औषध साठा. वापरले जाणारे औषधांचे सटाॅक रजिस्टर मिळावे
# महिलांसाठी डिलिव्हरी काळात. जननी शिशु सुरक्षा योजना राबविली जाते का. महिलांसाठी हॅणडगलोज. काॅट. औषध. महिला नर्स उपलब्ध आहे का
# दाताचे हाडांचे एक्सरे. रक्त लघवी. विविध आरोग्यदायी टेस्ट करण्यासाठी लॅब व डॉ उपलब्ध आहेत का
# सरकारी दवाखाना किती दिवसांनी निर्जंतुकीकरण केला जातो त्यासाठी नियुक्त असलेलें सफाई कर्मचारी संख्या. सरकारी आहेत कां खाजगी ठेकेदार कंपनीचे नाव
#. डेरसिंग करण्यासाठी सरकारी दवाखान्यात सेप्रेट नर्स वार्डबाॅय नियुक्ती आहे का
# सापाची व कुत्र्याची लस बारमाही उपलब्ध असणारे रजिस्टर
# सरकारी दवाखान्यात पी एम केलेलें रजिस्टर आहे का नाव गाव पत्त्यासह.
# सरकारी दवाखान्यात असणारी रुग्णांसाठी उपयोगी पडणारी अॅमबुलनस. व इतर वाहने. त्यांचा दैनंदिन हालचाल रजिस्टर
# आपल्या तालुक्यातील उप जिल्हा रुगणालया बाबत जनमाणसातू असलेलें मत त्याचा लेखाजोखा
#. गोवर पोलिओ व इतर लसीचे डोस केव्हा व कुठल्या वारा दिवशी दिले जातात त्यासाठी नियुक्त असलेलें डॉ नर्स यांची नाव गाव पत्ता मोबाईल नंबर सह
#. रुग्णालयात जनरेटर सोय आहे का असेलतर किती मेगावॉट आहे.
# जिल्हा उप रुग्णालय वितरण केले जाणारे औषध जेनरिक औषध असते काय
# जिल्हा उप रुग्णालय कामकरणारे डॉ नर्स व इतर कर्मचारी यांचें मासिक वेतन रजिस्टर
# पंतप्रधान आयुष्मान आरोग्य योजना. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना. महात्मा फुले जन आरोग्य योजना. धर्मादाय दवाखाने यांचें अंतर्गत उपचार होतात काय असेल तर पेशंट रजिस्टर
# एमरजनसी पेशंट साठी संध्याकाळी मुक्कामाला असणारे डॉ नर्स यांची माहिती
#. जिल्हा उप रुग्णालय यांचेकडून डोळे तपासणी. नाक कान घसा असे विविध आरोग्य व रोगांची तपासणी व निदान करण्यासाठी या वर्षी किती महा कॅम्प आयोजित करण्यात आले. गाव ठिकाणं
#. जिल्हा उप रुग्णालयात आपले कर्तव्य बजावणारे डॉ नर्स यांची सरकारी दवाखाना सोडून इतरत्र ओपिडी आहे का त्याची माहिती नाव गाव पत्ता सह
अशा विविध प्रश्नांसाठी आजच आपल्या जिल्हा उप रुग्णालय माहिती अधिकार दाखल करा. आपणांस आवश्यक असणारी माहिती आपणांस देणें बंधनकारक आहे
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९