You are currently viewing वेल

वेल

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या लेखिका कवयित्री रेखा कुलकर्णी यांची अप्रतिम अलंकार काव्यमाला

*अष्टाक्षरी*

कर्णफुले बाई माझ्या,
कानी किती जड झाले.
त्याला आधार देण्याला,
वेल सुवर्णाचे ल्याले.

मोतीयाचे घोस किती,
लगडले या वेलाला.
कधी मुक्या घुंगराची,
लड जडविली तिला.

कर्ण फुलातून थेट,
कुंतलात स्थिरावते.
जडावाची मीनानक्षी,
छान शोभून दिसते.

कधी काना भोवताली,
गोल वेटोळा घालते.
कानातील कुंडलाचे,
तेज आणखी वाढते.

देते कर्ण शृंगाराला,
वेल पूर्णत्व सात्विक.
असे स्त्री मनाला त्याची,
मनी ओढ स्वाभाविक.

रेखा कुलकर्णी ©®
चिंचवड, पुणे.
सर्व हक्क स्वाधीन
१०/९/२०

प्रतिक्रिया व्यक्त करा