🍥 *!! विठ्ठल विठ्ठल !!* 🍥
*कृतज्ञता हा यशाचा पासवर्ड* त्यात यश म्हणजे काय” यश म्हणजे काही *destination* नाही. एकदा मिळालं की संपल अस ते नाही. यश ही गोष्ट प्रत्येक पावलोपावली आपल्याला हवी असते . लहानपणी यशाची *definition* वेगळी असते.थोड मोठं झाल्यानंतर यशाची *definition* बदलत जाते.आणि *senior citizen* झाल्यावर यशाची *definition* आणखी बदलत जाते. म्हणून प्रत्येक आयुष्याच्या टप्प्या टप्प्यावर यश म्हणजे काय ” हे जर तुम्ही विचारल तर तुम्हाला प्रत्येकाच उत्तर वेगळं मिळेल. लहानपणी मुलाला विचारल की यश म्हणजे काय” तर तो म्हणेल की शाळेत माझा पहिला नंबर आला तर मी यशस्वी झालो. दहावीत असलेला मुलगा सांगणार की दहावीला मी ९५ टक्के मार्क मिळवले तर मी यशस्वी झालो.त्याच्यानंतर त्याला जी प्रोफेशन पाहिजे ते मिळालं की त्याला वाटत मी यशस्वी झालो. नंतर त्याला जॉब मिळाला की त्याला वाटत मी यशस्वी झालो नंतर लग्न केलं की त्याला वाटत यशस्वी झालो ‘ म्हणून *जीवनाच्या टप्प्या टप्प्यावर यश ही गोष्ट बदलत जाते* थोडक्यात आपल्याला यश सतत पाहिजे. प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश हव असत.ते जर नाही मिळालं तर आपण दु:खी होतो.
*श्री प्रल्हाद (दादा) वामनराव पै*