*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य कवी लेखक दीपक पटेकर यांची काव्यरचना*
*काव्यप्रकार: अखंड काव्य*
*शीर्षक: प्रेम तुझ्यावर…*
एकच दिवस का म्हणावे
प्रेम तुझ्यावर आहे माझे
नयनांचे ते तीक्ष्ण बाणच
भेदून जाती हृदय तुझे
तुझे असे मग तुझ्या पाशी
उरेल काय ते सांग तरी
प्रेमाच्या मग होऊनी धारा
बरसू लागती प्रेम सरी
सरीवर सरी आनंदाच्या
ओलेचिंब करतील मन
ओलावलेल्या मनास तुझ्या
भेटतील ते सुखाचे क्षण
क्षण क्षण गुंतुनी बनते
आपल्या गोड नात्याची वीण
बरसात सुखाची होताच
विसरून तू जाशील शीण
शीण झटकून पुन्हा माझ्या
मिठीत आज तू येशील का?
एकत्र पाहिलेली स्वप्नं ती
माझ्या संग तू जगशील का?
©[दिपी]🖋️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६