You are currently viewing मा. ना. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ओरोस रुग्णालय येथे रूग्णांना ब्लँकेट वाटप..

मा. ना. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ओरोस रुग्णालय येथे रूग्णांना ब्लँकेट वाटप..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रतन भाऊ कदम व कार्यकर्ते यांचा सहभाग

 

ओरोस :

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. ना. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ओरोस रुग्णालय या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचे मुख्य शल्यचिकित्सक मा. डॉ. श्रीकांत पाटील (डीन) व डॉ. अनिल देसाई तसेच रुग्णालय परिचारिका यांच्या उपस्थितीत रूग्णांना ब्लॅंकेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा केला.

 

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस नेते रतन भाऊ कदम तसेच राष्ट्रवादी कार्यकर्ते वसंत कदम, चंद्रकांत फोंडेकर, उल्हास आसोलकर, विजय तुळसकर, रामचंद्र मेस्त्री, विश्राम सखाराम जाधव, सचिन देऊलकर, विकास मठकर, ऋत्विक जाधव, हर्षद तेरसे, सचिन सोनवडेकर, केशव जाधव, विजय कुडाळकर, भाऊ पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा