मालवण :
नागरीक बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठान व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संस्था नेरूर आणि कल्पवृक्ष ग्रामसंघ पेंडूर मोगरणे आयोजित गाईच्या शेणापासून व गोमुत्रापासून धुप, अगरबत्ती, विवीध वस्तू बनविण्याचे एक दिवसीय प्रशिक्षण पेंडूर सावंतवाडा.ता.मालवण संपन्न झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल गावडे ग्रामपंचायत, पेंडूरचे सरपंच सौ.सुनिता मोरजकर तसेच सौ. विजया सावंत, सौ. वनिता घाडी, सौ. दक्षता दिपक शिंदे, सौ.मनीषा हिंदळेकर, श्रीमती. सुहासिनी सावंत, सौ. रूपाली माळके, सौ. पुजा पांडुरंग माळके, सौ. सुवर्णा प्रभू, प्रणाली हिंदळेकर, सौ. विना परब, सौ. अमृता सावंत, सौ. जिविता गुराम, सौ. अपेक्षा परब, सौ. विशाखा सावंत, सौ.भार्गवी फोंडेकर, सौ.प्रिया सरमळकर, सौ. मानसी परब, सौ. रुपाली परब, सौ. लतिका कदम, सौ. सुदेष्णा परब, सुवर्णा परब, सौ. रुणाली परब या बचत गटातील महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाचे पुजन व दिपप्रज्वलनाने झाली. मान्यवरांचे स्वागत प्रिया सरमळकर यांनी केले.