You are currently viewing सावंतवाडी येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या सावंतवाडी शाखेच्यावतीने रविवारी सावंतवाडीत आर. पी. डी. हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षक आणि शिक्षिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या नि:शुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा लाभ सुमारे १५० प्राथमिक शिक्षक व शिक्षिकांची तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली.
ग्रामीण व अतिदुर्गम भागातील गरजू रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणाची आरोग्य सेवा मिळण्याच्या उद्देशाने गेले एक तप हे प्रतिष्ठान कार्यरत आहे. यासाठी अतिदुर्गम व दुर्गम गावांचीच निवड केली जाते. या प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविणकुमार ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्यासह शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक अभिनव उपक्रम सातत्याने राबविले जातात. देशाची भावी पिढी घडविणारे शिक्षक शिक्षिका आपल्या शैक्षणिक सेवेत व्यस्त असताना स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच त्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या उद्देशाने
सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानने या शिबिराचे आयोजन करण्यात केले होते.
या शिबिरात कोविड १९ नियमावलीचे तंतोतंत पालन करून रुग्णांना सॅनिटाइझरसह मास्क वितरण करण्यात आले. प्रत्येक रुग्णांची हिमोग्लोबीन, रक्तगट, ऑक्सीजन व तापमान लेव्हल तपासणी करण्यात आली. तसेच प्रत्येक रुग्णांची उपाशी पोटी व भरलेल्या पोटी अशी दोन वेळा ब्लड शुगरसह बाकी तपासण्या करण्यात आल्या.
या शिबिरात शल्यचिकित्सक डॉ शंकर सावंत, हृदय व मधुमेह तज्ञ डॉ नंदादीप चोडणकर, व डॉ चेतन परब, नेत्ररोग तज्ञ डॉ विशाल पाटील व डॉ. स्वाती पाटील, स्त्री रोग तज्ञ डॉ. भक्ति सावंत, सौंदर्य तज्ञा डॉ संजना देसकर, जनरल फिजिशियन डॉ मुग्धा ठाकरे, डॉ. प्रणाली गोलघाटे व डॉ. प्रविणकुमार ठाकरे यांनी रूग्णांची तपासणी केली.या शिबिरात लॅब टेक्निशियन सौ मयुरी सावंत, भार्गवराम शिरोडकर, दिपक गावंकर, संतोष नाईक, अँड्र्यू फर्नांडीस, निलेश माणगांवकर, भगवान रेडकर, आनंद मेस्त्री, सिद्देश मणेरीकर, आसिफ शेख, अंटोनेट फर्नांडीस, रवी जाधव, प्रकाश पाटील या सिंधुमित्रांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्त चिटणीस म.ल देसाई, आर पी डी चे मुख्याध्यापक जगदीश धोंड, जिल्हा सचिव बाबाजी झेंडे, तालुकाध्यक्ष संजय शेडगे, सरचिटणीस अमोल पाटील, पतपेढी संचालक प्रमोद पावसकर, माजी तालुकाध्यक्ष सुभाष सावंत, माजी सरचिटणीस गुरुनाथ राऊळ, महिला प्रमुख महिला प्रमुख श्रावणी सावंत, महिला तालुकाध्यक्ष वंदना सावंत, महिला सचिव तेजस्विता वेंगुर्लेकर, कोषाध्यक्ष नेहा सावंत, कार्याध्यक्ष महेश पालव, दीपक राऊळ, रवींद्रनाथ गोसावी, भास्कर गावडे, मनोहर गवस, राधिका परब, सीमा पंडित, रेखा कुंभार विजय गावडे, संदीप गवस, आर बि गावडे महेश सावंत, नितीन सावंत, अरविंद सरनोबत, भास्कर गावडे, संतोष रावण, दशरथ सावंत, विलास फाले, नंदकिशोर कवठणकर, श्याम कळसुलकर, बापूशेठ कोरगावकर, अनिल वरक, शंकर पावसकर, दीपक पंडित, मनोहर परब आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × one =