You are currently viewing अध्यात्मिक लावणी

अध्यात्मिक लावणी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरविंद गणपुलें यांची अध्यात्मिक लावणी रचना

अर्पण केले हृदय तुम्हा हेच तुमचे धाम
तुम्ही माझे किशन न् तुम्हीच माझे राम !!धृ!!

का करू मी सांगा मज या जगाची पर्वा
तुम्हीच आहात स्वामी माझे सांगेन सर्वा
ओठांवरती असेल कायम तुमचे हे नाम
तुम्ही माझे किशन न् तुम्हीच माझे राम !!१!!

शांत सोज्वळ रुपावर होते मीच भाळले
प्रेमात कधी पडले नाही मजला कळले
ना मिळे तेव्हापासुन जीवास या आराम
तुम्ही माझे किशन न् तुम्हीच माझे राम !!२!!

रोज करते मनापासूनच तुमची मी भक्ती
भक्ती करता मिळेल मज अंतर्यामी शक्ती
काळजात येऊन माझ्या करा ना विश्राम
तुम्ही माझे किशन न् तुम्हीच माझे राम !!३!!

अरविंद गणपुले

प्रतिक्रिया व्यक्त करा