कुडाळ पंचायत समितीचे सभापती सौ.नूतन आईर यांनी कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी लक्षवेधी पुकारलेल्या उपोषणासमोर अखेर जिल्हा प्रशासन नरमले.स्थानिक लेका निधी अंतर्गत विशेष लेखा परीक्षण करून पंधरा दिवसाचे आत अहवाल सादर करण्याचे दिले आदेश तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले लेखी पत्र त्यानंतर उपोषण स्थगित केले.
गटविकास अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट व गैरकारभाराची चौकशी करू नये त्यांचा कारभार स्वच्छ व पारदर्शक आहे असा पंचायत समितीच्या मासिक सभेत सतरा विरुद्ध एक असा ठराव केला होता.तसेच उपसभापती यांचे सहित चौदा सदस्यांनी चौकशी करु नये अशी लेखी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन दिले होते. मात्र सभापत नूतन आईर यांनी सादर केलेले पुरावे प्रथम दर्शनी ग्राय्यअसल्याने स्थानिक लेखा निधी अंतर्गत विशेष लेखापरीक्षण व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याचे लेखी पत्र दिले.
या उपोषणाला सेवानिवृत्त शिक्षक चंद्रकांत सामाजिक कार्यकर्ते योगेश ठाकूर, जिल्हा परिषदेचे गटनेते रणजित देसाई, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, आरोग्य व शिक्षण सभापती डॉ. अनिषा दळवी, माजी जिप अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, भारतीय जनता पार्टीच्या महिला तालुकाध्यक्ष आरती पाटील, युवक तालुकाध्यक्ष रूपेश कानडे, युवक तालुकाध्यक्ष पप्या तवटे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, किसनमोर्चा अध्यक्ष सुर्यकांत नाईक, साळगाव सरपंच उमेश धुरी, वाडीवरवडे सरपंच अमेय धुरी, सोनवडे सरपंच धुरी, माजी सरपंच उदय सावंत, दिपक खरात, माजी सभापती मोहन सावंत, अवधूत सामंत, प्रितेश गुरव, तंटामुक्ती अध्यक्ष वामन गोडे, ग्रामपंचायत सदस्य विलास चव्हाण, ज्ञानदेव घाटकर, गायत्री गोवेकर तसे अन्य कार्यकर्ते ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून उपोषणाला पाठिंबा दिला.