You are currently viewing कर्नाटकातील प्रवेशासाठी आरटी-पीसीआरची सक्‍ती अखेर रद्द

कर्नाटकातील प्रवेशासाठी आरटी-पीसीआरची सक्‍ती अखेर रद्द

महाराष्ट्रातून कर्नाटकात येणार्‍या प्रवाशांना यापुढे आरटी-पीसीआर निगेटिव्ह चाचणीची सक्‍ती नसेल; पण कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तसा आदेश राज्याचे मुख्य सचिव टी. के. अनिलकुमार यांनी शुक्रवारी जारी केला.

महाराष्ट्रात कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेल्याने तसेच कर्नाटकातील संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्रातून कर्नाटकात येणार्‍यांना आरटी-पीसीआर निगेटिव्ह चाचणीची सक्‍ती करण्यात आली होती. कोणत्याही मार्गाने कर्नाटकात आले तरी त्यांना आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल सादर करावा लागत होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 10 =