You are currently viewing वैभववाडी करूळ घाटात कंटेनर पलटी : वाहतूक ठप्प

वैभववाडी करूळ घाटात कंटेनर पलटी : वाहतूक ठप्प

खड्डेमय घाटमार्गात अपघाताची मालिका सुरूच

वैभववाडी

खड्डेमय करूळ घाटात अपघाताची मालिका सुरूच आहे. आज सकाळी 9 वाजता करूळ घाटात धोकादायक वळणावर कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातामुळे घाट मार्गातील वाहतूक ठप्प झाली आहे. वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

फोकलेन मशीन घेऊन कंटेनर (नं एमएच 43- यु – 8562) पुण्याहून गोव्याकडे जात होता. करुळ घाटात पायरी घाट नजीक धोकादायक वळणावर कंटेनरचा अचानक चेस तुटल्याने कंटेनर रस्त्याच्या मधोमध पलटी झाला. या अपघातात कंटेनर चालक बालबाल बचावला आहे. तर कंटेनरचे व फोकलेन मशीनचे मोठे नुकसान झाले आहे.

या अपघातामुळे करुळ घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे घाटात कंटेनरच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामार्गे एकमेव सुरू असलेली राजापूर – सोलापूर ही एसटी बस घाटात अडकून पडली आहे. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत. क्रेनच्या साह्याने कंटेनर बाजूला केल्यानंतरच या मार्गातील वाहतूक पूर्ववत होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा