You are currently viewing दशावतार क्षेत्रात अधिराज्य गाजवणारे *लोकराजा सुधीरजी कलिंगण* यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

दशावतार क्षेत्रात अधिराज्य गाजवणारे *लोकराजा सुधीरजी कलिंगण* यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

दशावतार क्षेत्रात अधिराज्य गाजवणारे *लोकराजा सुधीरजी कलिंगण* यांना भावपूर्ण श्रद्धांजली……🙏🏻🙏🏻

 

दशावतारात हिरा जन्मला,

लोकराजा ओळखू लागला

गाजला कोकणात या *सुधीर कलिंगण* गाजला……२ !!धृ!!

 

दशावतारात जीव ओतुनी, केली सादर कला……

अभिनयाने वेड लाविले, साऱ्या रसिक जनाला…..

लोकराजा, गंधर्व अनेक नावांनी,

ठसा हा उमटविला…….!!१!!

 

बालपणापासून दशावताराचा,

वारसा हा जपला…..

कलेश्वर दशावतार नाट्यमंडळातून, नावारूपास आला……

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, बेळगाव ,

दशावतार पोचविला…..!!२!!

 

 

लोकराजाच्या अकाली जाण्याने,

कोकण हळहळला…..

दशावतारातील *अजिंक्यतारा,* पोरकं करुनी गेला…..

पुन्हा जन्म घ्या अशी विनवणी,

रसिकजन करू लागला….!!३!!

 

*(चाल:- साजला शिवसेनाप्रमुख एकच साजला)*

 

✍🏻 शब्दलेखन✍🏻

*दिपक येडगे*

७७९८३४२८६१

कुसबे, कुडाळ, सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + eight =