You are currently viewing देदोनेवाडी,व तऺरदळे लघू पाटबंधारे प्रकल्प मार्गी

देदोनेवाडी,व तऺरदळे लघू पाटबंधारे प्रकल्प मार्गी

*सिंधुदुर्ग जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे यश; प्रफुल्ल सुद्रीक*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक वर्षे प्रलंबित असलेले देदोनेवाडी व तरऺदळे लघू पाटबंधारे प्रकल्प पुर्णत्वास जावे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रीक यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमत्री ना.अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांच्या कडे सतत पाठपुरावा केलेल्या प्रयत्नांना यश येऊन तऺरदळे व देदोनेवाडी प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता देऊन तरऺदळे *प्रकल्पासाठी १२६ कोटी एकोणचाळीस लक्ष रुपये निधी, व देदोनेवाडी प्रकल्पासाठी ५६ कोटी तीन लक्ष एकोणऐशीस हजार रुपये* मंजूर करून हे दोन्ही लघू पाटबंधारे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होऊन अनेक वर्षे हे प्रकल्पअपूर्ण असल्याकारणाने स्थानिक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात विकासात्मक दृष्टीने नुकसान झालेले आहे. आता हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जो आवश्यक निधी उपमुख्यमंत्री तथा अर्थमत्री ना. अजितदादा पवार व या विभागाचे मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांनी दिला. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस व लाभक्षेत्रातील शेतकरी बांधव यांनी दोन्ही नेत्यांचे आभार व्यक्त केले असून निधी जरी मंजूर केला असला तरी हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी संबंधित अधिकारी वर्गाला तशा सुचना द्याव्यात. अशी आशा व्यक्त करुन या प्रलंबित प्रकल्पांना योग्य वेळी योग्य दिशा देऊन जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रीक यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. त्याबद्दल त्यांचेही प्रकल्पग्रस्त भागातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 9 =